Ahilyanagar News : नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारीदेखील (१४ मे) अवकाळी पाऊस झाला. मात्र, बुधवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची नोंद झालेली नाही.
दरम्यान गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शहर व जिल्ह्यात शनिवारी व रविवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
सोमवारी दिवसभर कडक ऊन होते. सायंकाळी मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी मध्यरात्री शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
शहरातील नालेगाव महसूल मंडळात मध्यरात्री १२ ते १२.५५ या कालावधीत सर्वाधिक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नगर ०.१, पारनेर ४.५, कर्जत २.८, जामखेड २.६, शेवगाव १.५, कोपरगाव ३, राहता ३.६ मिलिमीटर पाऊस झाला.
सर्वाधिक पाऊस पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव मंडळात १८ मिलिमीटर झाला. तळेगाव (संगमनेर) महसूल मंडळात सर्वाधिक १६.८ पाऊस झाला. त्या खालोखाल पारनेर तालुक्यातील पळशी १५, जामखेड तालुक्यातील अरणगाव महसूल मंडळात ७.३, खर्डा महसूल मंडळात ३.५,
शेवगाव शहर ४.५, कर्जत शहर ९, राशीन ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील चार दिवस हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.