Ahilyanagar News : आतापर्यंत अनेक ठराव होतात मात्र त्यांचे किती प्रमाणात पालन केले जाते हा मोठा विषय आहे. परंतु नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने फक्त ठराव न करता प्रत्यक्षात कारवाई केली आहे.
शुक्रवारी (दि.२८ नोव्हेंबर) सौंदाळा गावात ग्रामसभा झाली होती. त्यावेळी गावात शिवीगाळ बंदीचा ठराव केला होता. असे केल्यास पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्याचाही निर्णय झाला होता. या ठरावाचे राज्यात कौतुक केले जात आहे.
मात्र रविवारी (दि.१ डिसेंबर) सौंदाळा येथील शांताराम आढागळे व ठकाजी आरगडे यांचे शेतीच्या बांधावरून वाद झाले, तेव्हा दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्याबद्दल सौंदाळा ग्रामपंचायतने दोघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर एकमेकांना शिव्या देणाऱ्या दोघांनीही शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला.
रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभा ठराव अन्वये शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड ठरविण्यात आला होता. त्यानंतर दोन व्यक्तींना दंड केल्याचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले.
सौंदाळा गावचा शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड करण्याचा ठराव सोशल मिडिया व वर्तमान पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह देशात प्रसिद्ध झाला आहे त्यानंतर ग्रामपंचायतने केलेल्या दंडास महत्व प्राप्त झाल आहे.
दि.१ डिसेंबर रोजी सौंदाळा गावातील शांताराम आढागळे व ठकाजी आरगडे यांचे शेतीच्या बांधावरून वाद झाले. तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या. सकाळी सरपंच शरद आरगडे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या जागेवर गेले. तेथे जाऊन शांताराम व ठकाजी आरगडे यांना बांधावर खांब उभे करण्याचे सांगून वाद मिटविला.
यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य केले. त्यावेळी ग्रामसभेत ठरल्यानुसार शिवीगाळ केल्याने ग्रामपंचायतीचा प्रत्येकी ५०० रुपये दंड भरला.
ग्रामपंचायतीने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. यापुढे शिव्या देऊन अपमान न करण्याचा सल्ला दिला. बांध भाऊ म्हणून गोडीगुलाबीने राहण्याची समज दिली. दंड भरून यापुढे शिवीगाळ करणार नसल्याचे ठकाजी व शांताराम आरगडे यांनी कबूल केले.
दरम्यान आता या ग्रामपंचाययतने थेट कारवाई केल्याने देखील त्यांचे कौतुक केले जात आहे. यामुळे बंदावरून होणारे वाद रोखण्यास मदत होणार आहे.