Ahilyanagar News : आपण डॉक्टरला देव मानतो. कारण आजारी अथवा अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनेकांना डॉक्टरांनीच जीवदान देतात. मात्र याच डॉक्टरच्या पेशाला काळीमा फासणारी घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे.
आजारी असल्याने तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पिडीतेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलींच्या वसतीगृहावर असतांना आजारी पडल्याने रेक्टर व मैत्रीण अशा आम्ही तिघी येथील एक हॉस्पीटल येथे गेलो. तेथे कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले. तेथे ते डॉक्टर आले.
त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगीतले. तेव्हा डॉक्टरनी तपासतांना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून लैंगीक अत्याचार केला.
तेव्हा मैत्रीण व रेक्टर मदतीला आल्या असता तेथील कर्मचारी महिलेने व डॉक्टरने त्यांना शिवीगाळ केली व झाडूने मारले.
यावेळी पिडीता व तिच्या बरोबरील दोघी प्रचंड घाबरून गेल्या होत्या .
याप्रकरणी पीडीत विद्यार्थीनिने श्रीरामपूर शहर पोलीसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.