केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये टोयोटा किर्लोस्कर कंपनीने सर्वांना परवडेल अशा किंमतीत लॉन्च केलेल्या एसयुव्ही श्रेणीतील ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर चे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी वासन टोयोटाचे जनक आहुजा, अनिश आहुजा, दीपक जोशी, उदय सुरवे, सौरभ श्रोत्री, बाळासाहेब बारस्कर, अमित कोठारी, इंद्रजित नय्यर, हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, जय रंगलानी, गुलशन कंत्रोड, अभिमन्यू नय्यर, जतिन आहुजा, कैलाश नवलानी, मुन्नाशेठ जग्गी, सोमनाथ चिंतामणी, एचडीएफसी बँक भिंगार शाखेचे मॅनेजर सचिन मानकर, संदीप भळगट आदींसह शोरुमची सेल्स टीम व ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, टोयोटा किर्लोस्कर कंपनी ग्राहकांच्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील असून, ग्राहकांची गरज व आवड ओळखून दर्जेदार वाहन बाजारपेठेत आनले आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन कारची बनावट असून, न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर आकर्षक लुकमध्ये विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. वासन टोयोटा शोरुममध्ये ग्राहकांना मिळणारी उत्तम सेवेमुळे मोठा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला असून, उत्तम सेवा शोरुमच्या माध्यमातून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मा.आ. अरुणकाका जगताप व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी शोरुमला भेट देऊन अनावरण करण्यात आलेल्या ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर या कारची पहाणी केली. अरुणकाका जगताप यांनी नव्याने दाखल झालेल्या व सर्वांच्या अवाक्यात असलेल्या या कारमध्ये उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची भावना व्यक्त केली.
एसयुव्ही श्रेणीतील ग्राहकांचा कल कंपनीने नुकतेच ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर लॉन्च केली आहे. जी भारतातील त्याच्या मजबूत आणि संपूर्ण श्रेणीतील विविध गुणवैशिष्टये असलेल्या एसयुव्ही लाईनअप मध्ये गतिशील जोड आहे. बाजारपेठेत ही नवीन कार दाखल करुन कंपनीने एसयूव्ही सेगमेंट मध्ये पुन्हा प्रवेश झाल्याचे चिन्हांकित करून ग्राहकांना आधुनिक शैली, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रतिष्ठेची भावना प्रदान केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी कंपनीचे हे नवीन उत्पादन एसयूव्ही श्रेणीतील प्रमुख उपस्थितीला आणखी मजबूत करते.
ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर 1.0 लिटर टर्बो, 1.2 लिटर पेट्रोल आणि ई सीएनजी पर्यायमध्ये उपलब्ध आहे. 1.0 लिटर टर्बो 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारे पॉवर आणि परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी एक अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहे. 1.2 लिटर पेट्रोल, हायस्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इंटेलिजंट गिअरशिफ्ट (आयजीएस) मध्ये येते. तर 1.2 लिटर ई सिएनजी 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.
ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर 1.0 लिटर टर्बो पर्यायामध्ये 100.06 पीएस 5500 आरपीएम ची कमाल पॉवर वितरित करते.
मॅन्युअल साठी 21.5 किलोमीटर प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक साठी 22.0 किलोमीटर प्रति लिटर या श्रेणीतील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेसह पावर पॅक्ड ड्रायव्हिंग अनुभव देते. 1.2 लिटर पेट्रोल इंजन 21.7 मॅन्युअल आणि 22.8 (एमटी) प्रति किलोमीटरच्या इंधन कार्यक्षमतेसह एकूण 89.73 पीएस 6000 आरपीएम ची कमाल पावर देते. तसेच 28.5 प्रति केजी किलोमीटरची इंधन कार्यक्षमता ऑफर करणाऱ्या ई सीएनजी पर्यायमध्ये देखील उपलब्ध असल्याचे शोरुमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कारच्या अनावरणनंतर ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर पाहण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण तळेकर यांनी केले. आभार अनिश आहुजा यांनी मानले.