Ahilyanagar News : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतील मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सध्या सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे काही नेते आता आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत.
दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. यात राहुरीतून प्राजक्त तनपुरे व कोपरगावमधून संदीप वर्पे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यासाठीचे लागणारे शुल्कही त्यांनी भरले आहे.
राज्यात नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीला २३६ जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला ४९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना शिंदे गटाने ५७ जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत.
गेल्यावेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली होती. शिवसनेतील बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत आहेत .
नवनिर्वाचित आमदारांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली असून पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. मात्र तरीही शिंदेंकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत.
भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत महायुतील मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे.
सध्या सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे मात्र ईव्हीएम पडताळणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन पराभूत उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात राहुरीतून प्राजक्त तनपुरे व कोपरगावमधून संदीप वर्पे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यासाठीचे शुल्कही त्यांनी भरले आहे.