Ahilyanagar News : प्रत्येकवर्षी डिसेंबर महिन्यात व ख्रिसमसच्या काळात द्राक्षांना मोठी मागणी असते. त्यानुसार शेतकरी नियोजन करून द्राक्ष उत्पादन करत असतो. मात्र यावर्षी अवेळी पावसामुळे द्राक्ष बागांच्या छाटणीचे वेळापत्रक बिघडल्यामुळे वर्षाच्या शेवटी मागणीनुसार द्राक्ष मालाचा पुरवठा होत. नसल्यामुळे बाजारात द्राक्षांची टंचाई निर्माण झाली आहे

त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. प्रति पेटी ५०० ते ६०० रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे संकटांवर मात करून द्राक्ष उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील तसेच इतर द्राक्ष उत्पादकांना चालूवर्षी हंगामाच्या सुरुवातीच्या काळातच अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. त्यापैकी सरासरी २० टक्के क्षेत्रातील द्राक्षांची आगाप छाटणी घेतली जाते, मात्र चालू वर्षीच्या हंगामात आगाप छाटणी घेणाऱ्या उत्पादकांची संख्या ५ ते ७ टक्के आहे. जुलैपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढल्यामुळे आगाप छाटण्या घेण्यात आल्या नाहीत.याचा परिणाम म्हणून द्राक्ष हंगाम उशिरा होत आहे.

बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे द्राक्षांचे दर वाढले आहेत. दरवर्षीप्रमाणे बाजारात माल उपलब्ध होत नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत. ते द्राक्षमालासाठी थेट उत्पादकांशी संपर्क साधत आहेत. अनेक शेतकऱ्यांना माल देण्यासाठी विनंती केली जात आहे. येथील द्राक्षांची भुरळ जगभरातील खवय्यांना आहे.

चालूवर्षी तालुक्यात द्राक्षाची आगाप छाटणी घेण्याच्या काळातच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. निसर्गापुढे हतबल शेतकऱ्यांनी आगाप छाटण्या घेतल्या नाहीत. परिणामी द्राक्ष उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे.

प्रत्येकवर्षी डिसेंबर महिन्यात व ख्रिसमस सणाच्या काळात द्राक्षांना मोठी मागणी असते. त्यानुसार शेतकरी नियोजन करून द्राक्ष उत्पादन करत असतो. चालू वर्षी पावसामुळे आगाप छाटणीचे नियोजन करण्यात आले नाही. बाजारपेठेत द्राक्षाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र उत्पादन कमी असल्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही.

त्यामुळे द्राक्षाचे दर वाढल्याचे दिसत आहे. बाजारात द्राक्षटंचाई जाणवत असल्यामुळे व्यापाऱ्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विक्रीसाठी द्राक्षे मिळावीत यासाठी व्यापारी अनेक मार्ग वापरत आहेत. काही व्यापारी तर मध्यस्थ बाजूला करून थेट द्राक्ष उत्पादकांशी संपर्कात आहेत.

आपणाला जास्तीत जास्त द्राक्षमाल मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आजपर्यंत आपला माल विकावा यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी दलालांच्या पाठीमागे धावत होते मात्र चालू हंगामात दलालच शेतकऱ्यांच्या संपर्कात असल्याचे चित्र दिसत आहे. प्रसंगी अपरिपक्क द्राक्षेसुद्धा विकत घेतली जात आहेत.