Home अहिल्यानगर त्यांच्यामुळे आम्ही भाजपात आलो मात्र तुम्ही त्यांच्याकडेच कानाडोळा केला ; पिचड समर्थक...

त्यांच्यामुळे आम्ही भाजपात आलो मात्र तुम्ही त्यांच्याकडेच कानाडोळा केला ; पिचड समर्थक नाराज

Ahilyanagar News : आदिवासी समाज भाजपाला स्वीकारायला तयार नाही. पिचड यांच्यामुळे आम्ही भाजपात आलो. मात्र भाजप मोहिते, कोल्हे, यांचा विचार करतो मात्र ८४ वर्षाचे ज्येष्ठ नेते पिचड यांच्याकडे कानाडोळा करतो, हे योग्य नाही.

अशी नाराजी जाहीर करत आता तुम्हीच सांगा आम्ही महायुतीसोबत कसे राहायचे, असा थेट सवाल करत अकोले मतदारसंघातील पिचड समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी मतदारसंघात आलेल्या गुजरातमधील समितीसमोर आमदारांच्या आपली नाराजी बोलून दाखवत आमचा पक्ष चिन्ह, याची आठवणही कार्यकर्त्यांनी दिली.

तसेच आमची भावना राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाकडे मांडावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे अकोले तालुक्यात वैभव पिचड विधानसभेच्या मैदानात उतरणार, याचे संकेत अधिक गडद झाले आहेत.

बुधवारी गुजरात येथील दोहा मतदार संघाचे विद्यमान आमदार कन्हैयालाल किशोरे, व त्यांच्या सोबत ५ सदस्यांची निरीक्षण समिती अकोले तालुक्यात आली होती. त्यांनी १० गावांना भेट देऊन कार्यकर्त्यांची बाजू समजून घेतली. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ भाजप नेते सीताराम भांगरे उपस्थित होते .

आमदार कन्हैयालाल किशोरे म्हणाले, अकोले विधानसभा मतदार संघात येण्याची माझी दुसरी वेळ असून मी माजी मंत्री पिचड यांना नाशि क येथे भेटून आलो आहे. माजी आमदार वैभव पिचड यांची भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

सर्वसामान्य कार्यकर्ता थोडा दुखावला असून त्यांची माफक अपेक्षा मी समजू शकतो. मात्र निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांना असून त्यांच्यापर्यंत मी तुमचा निरोप पोचवतो. प्रास्ताविक काशिनाथ साबळे यांनी केले तर आभार चंद्रकांत भांगरे यांनी मानले.