Ahilyanagar News : प्रसुतीवेदना सुरू असलेल्या एका महिलेला घेऊन अहिल्यानगरकडे येत असलेली रुग्णवाहिका अन ट्रॅक्टर तर मोटारसायकल व कार यांच्या झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. हि घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या अपघतात जखमींवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा शहरातील पिपाडा कुटुंबातील महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या त्यामुळे सुरवातीला तिला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार महिलेला १०८ रुग्णवाहिकेमध्ये घेऊन जाताना सकाळी ७च्या सुमारास कोळगाव नजीक रुग्णवाहिका आणि ट्रॅक्टर यांच्यामध्ये अपघात झाला.

या अपघातात रंजनाबाई सुरेश पिपाडा यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका चालक महेश लवादे यांचे पाय फॅक्चर झाले तर रुग्णवाहिकेमधील नर्स यांच्या हाताला दुखापत झाली. सुरेश पिपाडा हे जखमी झाले आहेत.

दरम्यान या जखमींना तात्काळ अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रसुतीसाठी चालवलेल्या महिलेला मुलगा झाला असून महिला व तिचे लहान बाळ दोन्ही सुरक्षित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

अपघाताची दुसरी घटना सायंकाळी ७ सुमारास चिखली घाटात घडली. यात तालुक्यातील आढळगाव येथील रहिवासी सुनील शाहू छत्तीसे व त्यांच्या पत्नी सविता छत्तीसे आहे हे दोघे चिखली घाटातून येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका एका चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात सुनील छत्तीसे जागीच ठार झाले तर सविता छत्तीसे या गंभीर जखमी झाल्या आहेत . त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.