Ahilyamnagar News : सध्या काळात कोणीही देव पहिलेला नाही मात्र रुग्णाचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरला आपण देव मानतो. मात्र आता हेच लोक पैश्यासाठी सर्वसामान्यांचा किती छळ करतात, जर एखाद्याकडे पुरेशे पैसे नसतील तर हे लोक कोणत्याही थराला जातील याचे जिवंत उदाहरण नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यात घडले आहे.
अहिल्यानगर शहरातील एका मोठ्या व नावाजलेल्या रुग्णालयात दाखल केलेल्या चिमुकल्याचा शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवी मृत्यू झाला मात्र या काळात उपचारासाठी मोठा खर्च झाल्याने पालकांकडे उर्वरित बिल भरण्यास पैसे नसल्याने हॉस्पिटलने चक्क त्या मुलाचा मृतदेह देण्यास नकार दिला.
यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून ‘त्या’ हॉस्पिटलला सूचना करत मुलाचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यास सांगितले असल्याची धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील दर्शन सोमवंशी हे गरिब असुन गरिबीशी संघर्ष करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा वेद (वय ३) यास ब्रेन ट्यूमर असल्याने त्याला २४ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर नगर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करतात दोन लाखाचे बिल देखील भरले होते व ५० हजाराची औषध खरेदी केली.
मात्र १८ डिसेंबर रोजी त्याचा दुदैवी मृत्यू झाल्यानंतर २ लाख ४५ हजार बिल भरा असे सांगण्यात आले. विनंती करुनही बील माफ होत नसल्याने व हॉस्पिटल समजून घेत नसल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यूचे संकट पैसे नसल्याने बॉडी मिळत नसल्याने जड अंतकरणाने ती सोडुन श्रीरामपूरकडे निघाले.
मात्र ही घटना एकाने फोनवर शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्त व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेश भारत सुराणा यांच्या कानावर घालताच, त्यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यस्त असताना घडलेला प्रकार सांगितला.
त्यांनी तात्काळ हॉस्पिटल व्यवस्थापनास सुचना देऊन नातेवाईकांना मुलाची बॉडी देऊन टाका असा आदेश देताच वरिष्ठ पातळीवर चक्र फिरताच त्याची बॉडी कुटुंबीयांना मिळाल्यानंतर या कुटुंबातील लोकांना अश्रू अनावर झाले. मात्र जर पैश्यासाठी असे हॉस्पिटल नागरिकांना वेठीस धरत असेल तर अशा राक्षस प्रवृतीला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.