Ahilyanagar News : कर्जतचा एसटी डेपो मंजूर व्हावा यासाठी आ रोहित पवार यांनी फार मेहनत घेतली म्हणून एसटी डेपो मंजूर झाला. तुम्ही मात्र योग्य व्यक्तीची निवड केली म्हणून मला अभिमान वाटतो सर्वसामान्यांसाठी काम करणारे आमदार रोहित पवार आहेत.

एसटी डेपो मंजूर करतेवेळी अधिकारी यांनी हा डेपो करणे म्हणजे महामंडळाचे फार नुकसान होईल पण आपण मंत्री पदाची पावर वापरून रोहित पवार यांची मागणी विचारत घेऊन डेपो मंजूर केला.

त्यामुळे रोहित पवार हे दोन महिन्यानंतर नक्की मंत्री होतील असा विश्वास मा. मंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कर्जत येथील एसटी डेपो लोकार्पण सोहळा कार्यक्रमात व्यक्त केला.

यावेळी माजी मंत्री परब यांनी आ राम शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली ते म्हणाले की, तुम्ही मंत्री होता की अधिकारी मंत्री होते. कायद्याच्या चौकटीत बसविण्याची जबाबदारी ही अधिकारी वर्गाची असते त्यासाठीच त्यांना नेमलेले असते.

तर आ रोहित पवार म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा एसटी डेपोचा प्रश्न बारा खात्याचे मंत्री असणारे राम शिंदे यांना सोडविता आला नाही, गेल्या पाच वर्षांत जेवढा विकास झाला नाही त्यापेक्षा जास्त विकास करू शकलो हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले.

आबासाहेब निंबाळकर यांच्या काळात झालेला विकास हा विकास होता तसा विकास झाला नाही. बस नसल्याने मुली, मुले व लोकांची अडचण होत होती नुसते खोटे बोलायचे मात्र काम करण्याची धमक नव्हती.

पोलीस स्टेशन करण्यासाठी गुन्हेगारी वाढवायचे असे सांगून पोलीस स्टेशन करता आले नाही तर आपण पोलीस स्टेशन आणले. अनेक गोष्टींसाठी आपण दुसऱ्या जिल्हाकडे पाहावे लागत होते, पण आता तसे होणार नाही पोलीस प्रशिक्षण केंद्र विदर्भात घालवले, मुंबईला जावून गोरे का होता प्रत्येक गोष्टीत कॉपी करत आहेत.अशी टीका आमदार राम शिंदे यांच्यावर केली. या कार्यक्रमात भाजपच्या अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.