१० जानेवारी २०२५ श्रीरामपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करीत सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सेवा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष व तालुक्यातील भैरवनाथ नगर ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच दिपाली फरगडे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतींचे कामकाज बंद आंदोलन सुरू आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनामुळे अनेक ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे.अहिल्यानगर सरपंच सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष दिपाली प्रविण फरगडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन थांबणार नाही आणि ते मुंबईपर्यंत नेले जाईल.

त्यांनी प्रशासनाला ठाम शब्दात सांगितले की,सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळाला नाही, तर या आंदोलनाचा अधिक व्यापक विस्तार केला जाईल.या आंदोलनादरम्यान भैरवनाथनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंच चंद्रभागाबाई काळे, प्रविण फरगडे, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ अकोलकर, प्रमोद फरगडे, चंदर शिंदे, भाऊसाहेब राऊत, चंद्रभान फरगडे, श्रीराम फरगडे,रावसाहेब शेळके,पंढरीनाथ फरगडे,सुनिल नेरकर,अंगणवाडी सेविका प्रमिला सुलाखे

योगिता गोरे,अनिता गायधने, ज्योती लबडे, पल्लवी फरगडे, जयश्री पाटील,अनिता होले,प्रफुल्ल पटारे, तृप्ती जगदाळे, यासीन शेख, सागर लबडे तसेच भैरवनाथ नगर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच यासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंच यांनी पाठींबा दर्शविलेला आहे.

यासाठी तालुक्यातील मालुंजाचे सरपंच अच्युतराव बडाख, वळदगाव सरपंच पुष्पा भोसले उंबरगाव सरपंच सुप्रिया भोसले, कडीत सरपंच सविता वडीतके, सराला सरपंच जयश्री औताडे, टाकळीभान सरपंच अर्चना रणनवरे, निमगाव खैरी सरपंच दत्तात्रय झुराळे, शिरसगावच्या सरपंच राणी वाघमारे,उक्कलगाव

सरपंच रविना शिंदे, गुजरवाडी सरपंच अलका गुजर, दिघी सरपंच अनिता जाधव, भोकर सरपंच शीतल पटारे, रांजणखोल सरपंच सागर ढोकचौळे, नायगाव सरपंच डॉ. राशिनकर, खोकरच्या सरपंच आशाबाई चक्रनारायण, खंडाळाच्या सरपंच छाया बर्डे यासह आदी गावातील सरपंचांनी ग्रामपंचायत कामकाज बंद ठेवण्यास पाठींबा दिलेला आहे.