Ahilyanagar News : श्रीगोंदा विधानसभेसाठी महिलांच्या उमेदवारीसाठी अनेकांची मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरु आहे, मात्र महिलांना उमेदवारी जाहीर झाल्यास इच्छुकांमधील अनेकांची चांगलीच गोची होणार आहे. त्यामुळेअशा वेळी बाकीचे इच्छुक वेगळा मार्ग स्वीकारणार कि तिकीट मिळालेल्या उमेदवारांचा प्रचार करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे, त्या अनुषंगाने अनेकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातुन विधानसभा निवडणुकीसाठी नेमके कोण कोणत्या पक्षाकडून तिकिटासाठी अग्रेसर आहे हे अद्यापही समजू शकले नाही.
मात्र मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत महिला देखील आघाडीवर असल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे या वेळी श्रीगोंदा तालुक्यात महिलाराज येणार असेच चित्र दिसत आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या अधिकृत तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आतापासूनच एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात अनेकांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
त्यामध्ये अनेकांनी मेळावे जाहिरातबाजी यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे तर काहीजण पत्रकबाजीवर समाधान मानत आहेत. त्यासाठी तालुकाभर झालेली बॅनरबाजी श्रीगोंदेकरांनी पाहिली आहेच, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात विधानसभेसाठी महिला उमेदवार असण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
त्यामध्ये सुवर्णा पाचपुते (ताई), अनुराधा नागवडे (ताई), प्रणोती जगताप (माई) आणि प्रतिभा पाचपुते (अक्का) याच्या माध्यमातून विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे.
श्रीगोंदा तालुकाभर नेत्याची विविध कार्यक्रमाला हजेरी यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात झालेली बॅनरबाजीतसेच भेटी गाठीवर असलेला जोर ,त्यामुळे विधासभेसाठी श्रीगोंदा तालुक्यातून महिलाच उमेदवार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.