Ahilyanagar news : सध्या सोशल मीडियामुळे अनेकांच्या जीवनात रंगीत दिवस येतात तर अनेकांच्या जीवनाचा बेरंग देखील होत आहे. सध्या तरुण पिढी सोशल मीडियाच्या मोठ्या प्रमाणात आहारी गर्ली आहे, मात्र यात अनेकदा त्यांची मोठी फसगत होत आहे.
इन्स्टाग्रामवर कॉल करून तू माझ्याशी बोल नाहीस तर तुझे कॉल रेकॉर्डिंग व मेसेज मी व्हायरल करेल असे म्हणुन महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळले तसेच तू मला भेटली नाही तर तुझे लॉजमध्ये काढलेले अश्लील फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन पीडित महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी एकजणा विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत पिडीत महिलेने जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे , यावरून सागर बाळु लोखंडे (रा.आरोळे वस्ती, जामखेड) याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोखंडे याने पीडित महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तसेच इन्स्टाग्रामवर कॉल करून तु मला आवडतेस, मला कॉल करत जा, माझ्याशी बोलली नाही तर मी तुझ्या मुलाला व नवऱ्याला मारून टाकेल, माझ्याकडे बंदुक आहे शी धमकी दिली.
त्यानंतर या धमकीमुळे सदरच्या महिलेने त्याच्याशी इन्स्टाग्रामवर बोलण्यास सुरवात केली. काही दिवसांनी तो पीडित महिलेला पैसै मागायला लागला व वेळोवेळी तिला धमकी देऊन ३० हजार ते ४० हजार रूपये पीडित महिलेकडून घेतले.
त्यानंतर काही महीन्यांनी सागर लोखंडे याने महिलेस फोन केला व लॉजवर भेटायला बोलवले, तुआली नाही तर घरी येऊन तुला मारून टाकेल अशी धमकी महिलेस दिली. त्यामुळे ती महीला घाबरली व त्याला भेटण्यास तयार झाली त्यानंतर तो तिला लॉजवर घेऊन गेला व पीडित महीलेवर अत्याचार केला.
त्यानंतर आरोपी हा वेळोवेळी पीडित महिलेस लॉजवर बोलावत होता. परंतु पीडित महीला गेली नाही. त्यामुळे सागर लोखंडे याने पीडित महिलेस धमकी दिली की तु जर माझ्या सोबत लॉजवर आली नाही तर तुझ्या सोबतचे लॉजमध्ये काढलेले अश्लील फोटो मी व्हायरल करेल अशी धमकी दिली.
पीडित महिलेस आरोपी हा जास्त त्रास देत असल्याने ही घटना तीने आपल्या पतीस सांगितली. यानंतर पीडित महिलेने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून सागर बाळू लोखंडे याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.