Ahilyanagar News : मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटत होती त्यामुळे राज्य शासनाने खासगी शाळेला तोड देण्यासाठी विविध योजना राबवल्या. जेणेकरून विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.
यातच राज्य शासनाने जिल्हा परिषद संचालित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना सुरू केली. परंतु अनेक शाळेत गणवेश वाटपाचा गोंधळ झाल्याने शिक्षकांना व पालकांना मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
पूर्वी गणवेशा संदर्भातील अधिकार हे शालेय व्यवस्थापन समितीला होते. मात्र मात्र, शासनाने धोरण बदलत समितीचे अधिकार काढून घेतल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ज्या बचत गटांना ड्रेस बनवण्याचा ठेका दिला आहे, त्यांनी सर्व अंदाजे काम केले आहे.
त्यामुळे जेवढा पट तेवढे गणवेश आले नाही. जेवढे गणवेश आले तेही विद्यार्थ्यांच्या मापाचे नाहीत व ते बदलून देखील मिळत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे ड्रेस येत नाहीत, तर काहींना घट्ट हिट आहेत.
मात्र सदरचे ड्रेस बदलून मिळत नसल्याने आता या ड्रेसचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी गणवेशा संदर्भातील अधिकार हे शालेय व्यवस्थापन समितीला होते. हे अधिकार समितीकडे असताना गोंधळ उडत नव्हता. मात्र, शासनाने धोरण बदलत समितीचे अधिकार काढून घेतल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
एप्रिल महिन्यात तालुक्यातील प्रत्यके शाळेतील पटाचे आकडे व विद्यार्थ्यांचे मोजमाप शिक्षण विभागाने राज्य शासनाला दिले. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात गणवेशाचे वाटप केले.
ते करताना एप्रिल ते जून महिन्यात शाळेची वाढलेली पटसंख्या गृहीत न धरता दिल्याने एप्रिलनंतर ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे.
तसेच ज्या बचत गटांना ड्रेस बनवण्याचा ठेका दिला आहे, त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मोजमाप न घेता सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापाच्या ड्रेसचा पुरवठा केला.
परिणामी जो विद्यार्थी अशक्त आहे, त्याला ड्रेस मोठा येऊ लागला आहे, तर जो विद्यार्थी सशक्त आहे, त्याला ड्रेस घालताच येत नसल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे.
पूर्वी शालेय व्यवस्थापन समितीला सर्व अधिकार असताना ही समिती गणवेश देणाऱ्या कापड दुकानदाराला शाळेत बोलावून घेत कापड पसंद करून प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे मोजमाप घेत तो शिवून शाळेत देत असत.
सध्या मात्र एकाच वर्गातील सर्वच मुलांची देहबोली ही एकसारखी आहे असे गृहीत धरून ड्रेसचे वाटप करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.