मोठ्या चोऱ्या, दरोडे, घरफोडींच्या गुन्ह्यांचा तपास लागतो मात्र मोटार सायकली चोरणारे चोरटे पोलिसांना सापडत नाहीत. गेल्या अकरा महिन्यांत १३०० मोटार सायकली चोरीला गेल्या असून, फक्त १६८ दुचाकी परत मिळाल्या आहेत.मोटार सायकल चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
जिल्ह्यात मोटार सायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.दररोज दोन किंवा तीन मोटारसायकली चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत.नागरिक रस्त्याच्या बाजूला, हॉटेल, हॉस्पिटल, दुकानांसमोर दुचाकी उभ्या असतात.चोरटे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी पळवितात.
अलिकडे घरासमोरून तसेच अपार्टमेंटच्या पार्किमधूनही दुचाकी लांबविल्या जात आहेत.काही क्षणातच चोरटे दुचाकी घेऊन पसार होतात.या दुचाकीचा वापर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचे प्रकार समोर आलेले आहेत.चोरीला गेलेल्या मोटारसायकली परत मिळवण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
त्यामुळे चोरीला गेलेली मोटारसायकल परत मिळेल,याची शाश्वत नाही.जानेवारी ते डिसेंबर दरम्यान शहरासह जिल्ह्यात १३४० मोटारसायकली चोरी झाल्या आहेत.मोटारसायकल चोरीचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत.यापैकी अवघ्या १६८ मोटारसायकली परत मिळालेल्या आहेत.
उर्वरित मोटारसायकली वर्षे उलटले तरी मिळालेल्या नाहीत.त्यामुळे चोरीला गेलेली मोटारसायकल परत मिळणे नाही,असे याबाबत बोलले जात आहे.दुचाकीची टाकी, मशीन, रिम, शॉकअप, यासह इतर स्पेअरपार्ट वेगळे करतात आणि त्याची विक्री करतात.
दुचाकी तोडल्यामुळे तिचा तपास लागत नाही आणि त्यामुळे गाड्यांच्या तपासातही अडचणी येतात कारण चेसीस नंबरही राहत नाहीत.अशा दुचाकींचा तपास कसा करायचा,असा प्रश्न पोलिसांसमोर आहे.
चोरट्यांनी आता चारचाकी चोरीकडे मोर्चा वळविला आहे.गेल्या अकरा महिन्यांत ७४ मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. यातील २१ चारचाकी सापडल्या असून,उर्वरित चारचाकी अद्याप सापडलेल्या नाहीत.चारचाकीचे मालक पोलिस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत.
जुन्या मोटारसायकलींची संख्या मोठी आहे.जुन्या मोटारसायकलींचे लॉक मजबूत नसतात.अनेकजण मोटारसायकलींना लॉक लावत नाहीत.अशा दुचाकी चोरीतून किमान १५ ते ३० हजार रुपये मिळतात.त्यामुळे चोरट्यांनी मोटार सायकलीकडे मोर्चा वळविला असून,ही चोरी पकडलीही जात नाही.
मोटारसायकल, मोपेड, इलेट्रॉनिक बाइक्सच्या किमतीत वाढ झाली आहे.दुचाकीच्या किमती १ ते २ लाखांपर्यंत आहेत. स्पोर्टस बाइक्स व इतर दुचाकींच्या किमती दोन लाखांहून अधिक आहेत.दुचाकीच्या किमती वाढल्या आहेत.दुचाकीच्या भरमसाठ किमती वाढल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे.
अनेकजण दुचाकी काही वेळासाठी उभी करायची झाल्यास हॅण्डल लॉक करतात.मात्र चोरटे काही क्षणात लॉक तोडून दुचाकी लांबवितात.हॅण्डल लॉक सुद्धा तोडून दुचाकी चोरीला जातात.कितीही लॉक लावले तरी चोरटे दुचाकी चोरतात. त्यामुळे केवळ हॅण्डल लॉकवर भरोसा नको,मग आता करायचं तरी काय ? असे म्हणण्याची वेळ आहे.