येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध व सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,राहुरी पोलीस स्टेशन येथे काल गुरूवारी (दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने तसेच अथक परीश्रम घेवून गुन्हयातील अपहरण झालेल्या मुलीचा माग काढून तिचा शोध घेतला असता,ती नुकतीच मिळून आल्याने तीला राहुरी पोलीस स्टेशन येथे आणले आहे.
अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती दिली असून अपहरण झालेल्या मुलीकडे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत आहे.सदर मुलगी मिळून आल्याने त्यांचे नातेवाईक आईच्या ताब्यात दिले आहे.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सन २०१६ मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन २०२१ मध्ये अपहरण झालेल्या २ मुली, सन २०२२ मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन २०२३ मध्ये अपहरण झालेल्या ५ अल्पवयीन मुली तसेच सन २०२४ मध्ये अपहरण झालेले एकूण २२ मुली व ५ मुले
असे एकूण ३६ अपहरित बालकांचा (३० मुली व ५ मुले) जानेवारी २०२४ पासून शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देवून अपहरण करणाऱ्या ३६ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय आर. ठेंगे, पो.स.ई. धर्मराज पाटील, पो.हे.कॉ. अशोक शिंदे, लेखनिक पो. कॉ. गणेश लिपणे, महिला पो.कॉ. वृषाली कुसळकर व पो.ना.सचिन धनड, पो.ना. संतोष दरेकर, पो. ना. रामेश्वर वेताळ यांनी केली आहे