वाहन चालकांना मुजोरी चांगलीच भोवली आहे.वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांच्या वाहनांचे फोटो काढून घेण्यात आले असून,गेल्या अकरा महिन्यांत १ लाख वाहन चालकांना साडेनऊ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
वाहन चालक पूर्वी सिग्नल,ट्रीपल सीट,सीट बेल्ट न लावता चौकातून भरधाव निघून जात होते.अशा वाहनांना पकडणे पोलिसांना शक्य होत नव्हते.त्यामुळे वाहन चालकांना दंड होत नव्हता.आता मोबाइलद्वारे वाहनाचा फोटो काढून तो अॅपवर डाउनलोड केल्यास ऑनलाइन दंड आकारता येतो.
असे असले तरी वाहन चालक नियमांचे पालन करत नाहीत.चौकात सिग्नल पडण्याआधीच भरधाव निघून जातात.काही जण ट्रीपल, सीट, अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट न वापरणे, यासारख्या कारवाया करणे पोलिसांना शक्य झाले आहे.
मागील अकरा महिन्यांत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या १ लाख ९ हजार ९६७ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.ऑनलाइन दंडाचे सर्व खटले न्यायालयात जातात.त्यामुळे वाहन मालकांना हा दंड भरावाच लागतो.
शहरासह जिल्ह्यात एका दुचाकीवरून ट्रीपल सीट जातात.शाळा व कॉलेजची मुले, परप्रांतीय कामगार ट्रीपल सीट वाहने चालविण्यात आघाडीवर असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते.गेल्या अकरा महिन्यांत ९ हजार ७४९ जणांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या असून,त्यांना ९७ लाख ४८ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दुचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे.वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे.मात्र,स्वतःच्या सुरक्षेची वाहन चालकांना काळजी नाही.गेल्या ११ महिन्यांत सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्या १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना ६२ लाख ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
शासनाने दुचाकी वाहन चालक तसेच पाठीमागे बसलेल्या एकाला,अशा दोघांना हेल्मेट सक्तीचे केले आहेत.विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या ३ हजार ८१५ जणांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.गेल्या ११ महिन्यांत विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांना २६ लाख ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.ही रक्कम ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूने नागरिकांना पायी चालण्यासाठी फुटपाथ ठेवण्यात येतात.परंतु, वाहन चालक फुटपाथ वरूनही वाहने चालविताना पाहायला मिळतात.अशा वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. शहरात सध्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने एका बाजूने वाहतूक वळविण्यात आली आहे.