बालिकाश्रम रोडवरील बडोदा बँक कॉलनी येथील रहिवासी अभियंता वैष्णवकुमार गंगाधर परदेशी (वय २८) याच्यावर विजय राजेंद्र पठारे (रा. सिद्धार्थनगर) याने चाकूने डोक्यावर सपा-सप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. १५) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली आहे.

जखमी वैष्णवकुमार परदेशी हा रविवारी रात्री स्वतःच्या किरण दुकानात बसला असता अचानक गुंड विजय पठारे याने दुकानात घुसून डोक्यावर सपा- सप वार करून प्राणघातक हल्ला करून शिवीगाळ केली.

तू बाहेर ये तुला संपूनच टाकतो अशी जीवे मारण्याची धमकीही पठारे याने परदेशीला दिली आहे.या प्राणघातक हल्ल्यात वैष्णवकुमार परदेशी हा गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भर वस्तीत वाहत्या रस्त्यावर घडलेल्या या प्राणघातक हल्लाची घटना दुकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.याबाबत रात्री उशिरा वैष्णवकुमार परदेशी याच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विजय पठारे यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रविवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास मी कामावरून आल्यावर माझ्या किराणा दुकानाचे कॉऊंटर वर बसुन मोबाईल पाहत बसलेलो असताना विजु पठारे याने विनाकारण दुकानासमोर येवुन अचानक माझ्या डोक्यात चाकुने वार केला.

त्यावेळी मी माझा भाऊ श्रीनिवास याला आवाज देवुन बोलावले असता विजु पठारे मला म्हणाला तु बाहेर ये आज तुला सपंवुनच टाकतो अशी धमकी देवून मला घाणघाण शिवीगाळ केली.त्यावेळी माझा भाऊ घरातुन बाहेर आला तेंव्हा विजु पठारे याचे घरातील लोक येवुन त्याला त्याचे घरी घेऊन गेले.

हल्लेखोर विजय पठारे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्यांच्यापासून आमच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे.त्यामुळे पोलिसांनी गुंड वजय पठारे यावर कडक कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी हल्यातील जखमी वैष्णवकुमार याचा भाऊ श्रीनिवासकुमार परदेशी याने तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षकांकडे केली आहे.