अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला एक लाख ४ हजार ४२० रुपयांचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला – तंबाखू व गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला.शेवगाव शहरातील खालची वेस येथे बुधवारी (दि.४) रोजी ही कारवाई करण्यात आली.त्यात तीन जणांना ताब्यात घेतले असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलाल मोहंमद हनिफ तांबोळी (वय ३४),अरबाज मोहंमद रफीक तांबोळी (वय २२), अजिम फारूक तांबोळी (वय ४१), (सर्व रा. खालची वेस, काझी गल्ली, शेवगाव) यांना ताब्यात घेण्यात आले असून, अख्तर महेबूब आंबेकर (रा. पैठण), दादासाहेब अंकुश जाधव, आदिनाथ अंकुश जाधव (दोघे, रा. ता. गेवराई) तिघे पसार आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष लोंढे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ, पोलिस पाकिटे आढळून आली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता सर्व पानमसाला अख्तर आंबेकर, दादासाहेब जाधव, आदिनाथ जाधव यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले.
कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाठ, तसेच शेवगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबल गीतांजली पाथरकर यांनी यांनी शहरातील खालची वेस येथे राहणारे बिलाल, अरबाज व अजीम तांबोळी यांच्या घराची झडती घेतली.
तिथे १ लाख ४ हजार ४२० रुपयांचे विविध कंपन्यांचे ५७६ सुगंधी पानमसाला तंबाखू व गुटख्याची पाकिटे आढळून आली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता सर्व पानमसाला अख्तर आंबेकर, दादासाहेब जाधव, आदिनाथ जाधव यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले.
अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई ही राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी पानमसाला तंबाखू व गुटखा विकत घेऊन विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी फिर्याद दिली.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.