बऱ्याच जणांना भांडण झाल्यानंतर ते सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची सवय असते.त्यामुळे भांडण करणारे शांत होतातही पण काही ठिकाणी वाद अजून वाढून त्यातून भलतंच काहीतरी घडत असतं.अशीच काहीशी घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे.
घडलेल्या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी कि,तालुक्यातील चौकात एक अपघात झाला आणि दोन व्यक्तिमध्ये वाद सुरु झाला.हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जमावाने मारहाण केली आणि त्याचे आर्थिक नुकसान केले.
अपघात झाल्यानंतर भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना जमावाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील तीनबत्ती चौक परिसरात घडली.
मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी तरुणांचा मोठा जमाव शहर पोलिस ठाण्यात जमा झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील दिल्ली नाका परिसरातील एका पेट्रोल पंपासमोर दुचाकीचा अपघात झाला होता.या ठिकाणी निमोण येथील मिलिंद बबन घुगे (वय २७) थांबले. वाहनचालकांना समजावून सांगत असताना तेथे उपस्थित असलेल्या जमावातील तरुणांनी घुगे यांना मारहाण केली.
तिथे उपस्थित असलेले अविनाश रोहिदास गुंजाळ (रा. गुंजाळनगर) यांनाही काही तरुणांनी मारहाण केली.जमावातील तरुणांपैकी काहींनी हातातील टणक वस्तूने मारहाण करुन त्यांचा मोबाईल फोडला.
तसेच अविनाश गुंजाळ यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून ती घेऊन गेले.इतरांनी या दोघांना मारहाण केली.एका जमावाने मारहाण केल्याची वार्ता पसरल्यानंतर संतप्त अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले.