संगमनेर तालुक्यात संगमनेर-अकोले रस्त्यावरील मालपाणी उद्योग समूहाच्या परिसरात सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्या इसमावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेकायदेशीर रित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून दोन लाख रुपयांच्या गुटख्या सोबतच ५ लाख रुपयांचे वाहन,असा एकूण ६ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला गेला आहे.दरम्यान या व्यक्तीबरोबर असलेला दुसरा व्यक्ती फरार झाला आहे.

याबद्दल सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,पोलिसांना माहिती मिळाली होती कि अकोले रस्त्यावरून मारुती कंपनीच्या इको गाडीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच पोलीसांनी अकोले रस्त्यावर पोहोचुन संबंधित इसमाला ताब्यात घेतले पण दुसरा व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून निसटला.

पोलिसांनी (एम. एच ०१ डी.झेड ७९६०) नंबरच्या इको गाडीला अडवून या वाहनाची तपासणी करून गाडीमधील वेगवेगळ्या प्रकारचे पान मसाला, तंबाखू पोलिसांनी जप्त केले.

याप्रकरणी पोलिसांनी सनिल रमेश नाईकवाडे (रा. धामणगाव पाट, ता. अकोले) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यावर,त्याने हा गुटखा गोपाल नामक व्यक्तीकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी या गाडीमधील १ लाख ७४ हजार २४० रुपये किंमतीचा पान मसाला, १९ हजार ३६० रुपयांची तंबाखू जप्त केली.याशिवाय पाच लाख रुपये किंमतीची गाडी ताब्यात घेतली.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी सनिल रमेश नाईकवाडे व गोपाल (पूर्ण नाव माहित नाही, रा. कोल्हापूर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यापैकी पोलिसांनी सनील याला अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाला आहे.