अहिल्यानगर रेल्वे स्टेशनच्या आवारात इंगळे वस्ती आहे,या वस्तीमध्ये ९ तारखेला रात्री चोरट्याने घरात घुसून दीड लाखाची चोरी करून पोबारा केल्याची घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ऐवज जप्त केला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी कि,रेल्वे स्टेशन परिसरात इंगळे वस्ती येथे रात्रीच्या वेळी घरात घुसुन माहेरी आलेल्या महिलेचे दागिने चोरी करणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी पकडला आहे.त्याच्या कडून चोरीतील सुमारे दीड लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत काजल आकाश पंधारे (वय २५, रा. पोखर्डी, ता. नगर) यांनी दि.९ नोव्हेंबर रोजी पोलिसात फिर्याद दिली होती.इंगळे वस्ती येथे त्या माहेरी आलेल्या होत्या तेव्हा रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे आत प्रवेश करून त्यांच्या पर्स मधुन सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले होते.
त्यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना सूत्रांकडून गोपनीय मिळाली की,चोरी करणारा आरोपी हा रेल्वेस्टेशन परिसरात चोरीचे दागीने विकण्यासाठी आला आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळालयामुळे त्यांनी गुन्हे शोध पथक रेल्वेस्टेशन परिसरात पाठविले.या पथकाने सापळा लावुन संशयित इसम संजय ज्ञानदेव धिवर (वय.२९, रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन) याला ताब्यात घेतले.
त्याला पोलिसांच्या पथकाने विचारपुस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण नंतर त्याला अधिक विश्वासात घेवुन चौकशी केल्यावर त्याने केलेल्या चोरीची कबुली दिली आहे.
त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळ घरातून चोरी केलेले दागिने सापडले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ. शरद वाघ हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली महिला स.पो.नि. योगीता कोकाटे, स.फौ. सुनील भिंगारदिवे, पो.हे.कॉ. योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, विक्रम वाघमारे, राजेंद्र पालवे पो.कॉ. अभय कदम, अमोल गाडे, सतिष शिंदे, अतुल काजळे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.