मोमीनपुरा ते राजस्थान चौक या भागात महिलांच्या वस्तू विक्रीचे दुकाने उघडण्यात आली आहे.या दुकानदारांकडून महिलांचे नंबर घेतले जात असून यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा प्रकारचे मेसेज समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामुळे सामाजिक स्वास्थ सोशल मीडियामुळे बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.या मेसेज मागील सत्य सायबर सेल आणि पोलिसांनी समोर आणण्याची मागणी होत आहे.यंत्रणांनी या मेसेज मागील सत्यतेची खात्री करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
अन्यथा व्हायरल होणाऱ्या मेसेजमधून दोन धर्मियांमध्ये तेढ देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.निवडणूक काळात देखील धार्मिक तेढ निर्माण होणारे मेसेज समाज माध्यमात व्हायरल झाले होते.
त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सतर्क झालेल्या पोलिसांनी व्हाट्सअपच्या ग्रुप अॅडमिनला नोटीसा पाठवत ग्रुप ओन्ली एडमिन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून व्हाट्स अप ग्रुप सह विविध समाज माध्यमांवर संगमनेर शहरातील राजस्थान चौक या दरम्यान महिलां विषयक साहित्य विकणाऱ्या दुकानदारां विषयी मेसेज व्हायरल होत आहे.
या मेसेजमधून महिलांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याने पोलीस यंत्रणेने तातडीने यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.निवडणूक पूर्व व निवडणूक काळात घडलेल्या शहरातील घटनांना जातीय स्वरूप देण्यात आल्याने निवडणुकीनंतर
देखील त्यातलाच एक भाग म्हणून एका विशिष्ट धर्माविषयी व्हाट्सअपडरे सोशल मीडियावरून मेसेज पसरविले जात असल्याने या मेसेज मध्ये खरोखर तथ्य आहे का ? जाणीवपूर्वक या माध्यमातून कोणाची बदनामी केली जातेय याचा पोलिसांनी तपास करण्याची मागणी होत आहे.