Home क्राईम Ahilyanagar News : शेअर मार्केटचा नाद लैच बेक्कार असतो बाबा ! आता...

Ahilyanagar News : शेअर मार्केटचा नाद लैच बेक्कार असतो बाबा ! आता यापुढे स्वप्नात सुद्धा..

शेअर मार्केटच्या नावाखाली ३३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल होताच काही तासांतच पोलिसांनी सापळा लावून त्यांना जेरबंद केले आहे.

याबाबत अवधूत विनायक केदार (वय ४६), धंदा-नोकरी (रा. साईकृपानगर, खंडोबानगर, आखेगाव रोड, शेवगाव ता. शेवगाव.) यांच्या फिर्यादीवरून गुरुकृपा ट्रेडिंग इनव्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली एकूण-३३ लाख ५० हजार रुपये फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने १५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले (वय २७), रा. बाभुळगाव, ता. शेवगाव, फ्रान्सिस सुधाकर मगर (वय ५०), रा. आखेगाव रोड, शेवगाव, ता. शेवगाव. या दोन्ही आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल होताच ते पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले याला शेवगाव- पैठण रोडने जात असताना मोटार सायकलवरून पाठलाग करून पकडले तर फ्रान्सिस सुधाकर मगर याला आखेगाव रोड शेवगाव येथून ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपींना अटक करून जिल्हा सत्र न्यायालय, अहिल्यानगर येथे हजर केले असता, त्यांना ८ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.या आरोपींकडून कोणाची फसवणूक झाली असल्यान त्यांनी शेवगाव पोस्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. समाधान नागरे, पोसई प्रविण महाले, पोहेकाँ. चंद्रकांत कुसारे, पो.काँ. शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, फलके, धनेश्वर पालवे, प्रशांत आंधळे, देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो.काँ. राहुल गुंडू यांनी केली आहे.