दारुबंदी असलेल्या राजूरच्या बाजार पेठेत वाहनासह सुमारे दीड लाख रुपयांची अवैध दारुसाठा पकडून तरुणांनी राजूर पोलिसांच्या ताब्यात दिला.या प्रकारामुळे राजूर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, गावात अवैध दारू प्रकरणावरून पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संबंधीत तरूणांनी केली आहे.राजूर गावात २१ आक्टोबर २००५ साली दारूबंदीचा ठराव पारित होऊन दारुबंदी लागू करण्यात आलेली.

त्यानंतरही गावातील अवैद्य दारू, मटका, जुगार बंद व्हावेत,यासाठी राजूरकरांनी ग्रामसभेत ठराव केलेले आहेत.यासाठी मुख्यमंत्री ते जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे.मात्र, गावातील अवैद्य व्यवसाय बंद झालेले नाहीत.

अवैध व्यवसायामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून या अवैध व्यवसायात वाढ होत आहे.अनेकदा पोलिसांकडे याबाबत तक्रारी करूनही अवैध दारू, मटका, जुगारला पायबंद घालण्यात पोलिस आणि दारु उत्पादन शुल्क विभागाची यंत्राणा कुचकामी ठरलेली आहे.

दरम्यान, गावात पुन्हा तरूणांनी दीड लाख रुपयांची अवैध देशी-विदेशी दारू असलेली गाडी पकडली आहे.यावेळी विक्रम अशोक घाटकर (रा.राजूर) या दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

या प्रकरणाची पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख, अक्षय देशमुख यांनी केली आहे.

गावात बाजारपेठेतील स्वामी समर्थ मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत गाडीत अवैध दारु विक्री करणाऱ्या विक्रम अशोक घाटकर (रा.राजूर) याला तरूणांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

जर गावातील तरूणांना अवैध दारू विकणारे सापडतात मग पोलिस अथवा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडत नाही, या शब्दात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.