शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांवर ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्यूपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र उघड झाले आहे.मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात शिवाजीराव जोंधळे यांची पत्नी, दोन मुले, खोटे मृत्यूपत्र बनवणारे वकील, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर, साक्षीदार यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

वर्षा ही शिवाजीराव जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे.ती कायदेशीर वारस आहे.यामध्ये त्यांनी शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू दि. १९ एप्रिलला झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी, त्यांची दोन मुले यांनी त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करत दमदाटी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळेस शिवाजीराव यांच्या नावे असलेल्या शेतजमिनी नावावर करण्यासाठी एका मृत्युपत्राच्या आधारे वारस लावण्याचे प्रयत्न सुरू केले.त्यावेळेस वर्षा यांनी असे कुठलेही मृत्यूपत्र वडिलांनी तयार करून ठेवल्याचे त्यांना सांगितलेले नसल्याने त्यांना हे मृत्युपत्र बोगस असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याबाबत खात्री करण्यास सुरुवात केली.

दि. १३ मार्चला हे नोंदणीकृत मृत्यूपत्र नोटरी केल्याचे लक्षात आले,मात्र त्यावर असलेली सही ही खोटी असल्याचे देखील वर्षा यांच्या लक्षात आले.तसेच वडिलांचा १३ मार्चचा मोबाईल लोकेशनचा डेटा मागवले असता शिवाजीराव जोंधळे हे १३ मार्च रोजी मुंबई फोर्ट परिसरात गेले असल्याचे निदर्शनास आले नाही.

वर्षा देशमुख यांनी ३१ ऑक्टोबरला मुंबई येथील आझाद मैदान पौलीस ठाण्यात वडिलांचे खोटे मृत्यूपत्र बनवून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबतची तक्रार पोलिसांना दिली.फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते, मृत्यूपत्राचे साक्षीदार किशोर जोंधळे, चैतन्य बडवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आझाद मैदान पोलिसांनी पत्नी वैशाली जोंधळे, मुले सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, अॅड. निलेश मांडवकर, नोटरी वकील टी. सी. कौशिक,खोटे कागदपत्र तयार करत जोंधळे यांची संगमनेर तालुक्यातील मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणूक केली आहे.

त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की या लाडक्या बहिणीकडे लक्ष देऊन माझी सुरक्षा करावी.कारण त्यांनी आम्हाला मारण्याची धमकी दिली आहे.मला न्याय मिळवून द्यावा असे वर्षा देशमुख यांनी सांगितले.