शहरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी सोमवारी दि.९ रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही कारवाई केली.स्थानिक गुन्हे शाखेने झेंडीगेट परिसरातील एका कत्तलखान्यावर कारवाई करत ४१२० किलो गोमांस जप्त केले.

दुसऱ्या ठिकाणी केलेल्या कत्तलखान्यावरील कारवाईत डांबून ठेवलेल्या २ गायींची सुटका केली.दोन्ही ठिकाणी मिळून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील समोनि हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, विश्वास बेरड, गणेश लोंढे, अतुल लोटके, पंकज व्यवहारे, संदीप दरदले, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे यांच्या पथकातील पोलिसांनी ही कारवाई केली.

या पथकाने सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झेंडीगेट, शाळा क्र ४ च्या पाठीमागे छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ६५ हजार रुपये किंमतीच्या २ गायींची सुटका केली.

या गायी हाफीज जलील कुरेशी, गुफरान हाफीज कुरेशी, अल्ताफ खलील कुरेशी सर्व रा. झेंडीगेट यांनी या गायी डांबून ठेवल्याचे लक्षात आले. या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तसेच या पथकाने झेंडीगेट येथे अरबाज गुलामरसुल कुरेशी हा त्याच्या साथीदारासह बंदीस्त जागेत गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करत आहे.या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

तेथे बदीस्त जागेत दोघे गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले. रफीकउल इस्लाम जमालुद्दीन कुरेशी, हानसेन हारून कुरेशी अशी त्यांची नावे आहेत.

त्याठिकाणी पोलिसांनी १२ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे ४१२० किलो गोमांस, २०० रुपये किंमतीचा लोखंडी सुरा असा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.