कोपरगाव तालुक्यातील कारवाडीमध्ये शेतीच्या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन वादाचे रुपांतर मारामारीत झाले आणि एकास पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून जखमींवर उपचार चालू असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

कारवाडी येथील शेतीचा बांध कोरल्याच्या कारणावरून तीन जणांना लोखंडी पाईपने केलेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले होते.त्यात आरोपीविरुद्ध गुन्हा खरा ठरल्याने तिघा आरोपींना येथील न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा, प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय आबासाहेब वलटे आणि आरोपी सोमनाथ सीताराम वलटे हे चुलते-पुतणे आहे.त्यांच्यात शेतीच्या बांधावरून वाद आहेत.दरम्यान फिर्यादी दत्तात्रय वलटे हे आपले वडील आबासाहेब वलटे व आईसह (दि. ९) जुलै २०२० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे होते.

तेव्हा त्या ठिकाणी आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे, सोमनाथ सीताराम वलटे व महिला आरोपी हे आले व फिर्यादी व त्याचे घरातील अन्य सदस्यांना म्हणू लागले की, तुम्ही आमच्या शेतीचा बांध का कोरला?,असा जाब विचारून आरोपी सोमनाथ वलटे यांनी आपल्या हातातील लाकडी दांडा फिर्यादीच्या आईच्या डोक्यात मारला होता.

तर व्यंकटेश वलटे याने आपल्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात मारला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी मुलगा गेला असता, त्यांनी त्यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यात दोघं जण जखमी झाले.

त्यानंतर त्यांनी फर्यादीच्या आईलाही पाईपने मारहाण केली.फिर्यादी आणि त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाल्यावर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले होते.त्यानंतर जखमींना लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी दत्तात्रय वलटे याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा केला होता पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला होता.या गुन्ह्याची सुनावणी कोपरगाव मधील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर झाली होती.

या प्रकरणाची नुकतीच सुनावणी नुकतीच पूर्ण झाली होती.त्यात सरकारी वकील अॅड. प्रदिप रणधीर यांनी फिर्यादीच्या वतीने बाजू मांडली होती.

त्यात न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश भगवान पंडित यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे, सोमनाथ सीताराम वलटे व एका महिला आरोपीला दोषी धरून ३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावला आहे.