सध्या पाथर्डी तालुक्यात चोरटयांचा सुळसुळाट सुटला आहे.माळी भाबुळगाव येथील शिक्षक कॉलनीतील संगीता गोसावी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटयांनी पन्नास हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने, असा २,१०,००० रुपयांचा ऐवज चोरला आहे.

तसेच घाटशिरस येथील सुमन पालवे यांच्या घराचे कुलूप तोडून भरदुपारी रोख रकमेसह दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

या बाबत तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते.श्वानाने रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला त्यामुळे पोलिसांना काही ठसे मिळाले आहेत.त्याबाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पाथर्डी मधील शिक्षक कॉलनीतील संगीता राजेंद्र गोसावी या बाहेरगावी गेल्या होत्या.त्यांचे घर बंद असल्यामुळे त्यांच्या घरावर चोरट्यांनी लक्ष ठेऊन चोरी केल्याचे समजले आहे.त्यांच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी दि. २४ च्या रात्री तोडून घरात प्रवेश करत चोरी केल्याचे उघड झाले आहे.

गोसावी यांना मंदा ढाकणे यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. गोसावी यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील पन्नास हजार रुपये रोख व सोन्याचे आठ तोळ्यांचे दागिने, असा २१०००० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळले.त्यांनतर गोसावी यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली.

याबद्दल उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अमोल आव्हाड, अभय लबडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत तपास सुरू केला आहे.तपासा दरम्यांन पोलिसांना घराजवळच असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच जण तोंडाला फडके बांधलेले दिसले.चोरट्यांनी कुलूप तोडल्याचे आणि माल सोबत घेऊन गेल्याचे कैद झाले आहे.

अशीच चोरीची दुसरी घटना घाटशिरसय तेथे सोमवारी दुपारी अकरा ते साडेवाजण्याच्या दरम्यान घडली.सुमन बाबुराव पालवे यांच्या घरात देखील भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी कि,सुमन बाबुराव पालवे या देवराई येथे विवाहासाठी गेल्या होत्या तेव्हा दुपारी चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील १२५०० रुपये रोख व सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने, असा २०२५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.त्याबाबत पालवे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपासात लागले आहे.

दोन्ही घटनेत मिळून चार लाख बारा हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.तालुक्यात सध्या चोरीच्या घटना रोजच घडत असून चोरांना पोलिसांचे अजिबातच भय राहिलेले नाही.

तसेच चोरटे सुद्धा पोलिसांच्या तावडीत लवकर सापडत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे तालुक्यातील चोरांचा बंदोबस्त करून चोरीचा तपास लावून चोरटे जेरबंद करावेत,अशी मागणी नागरिक करीत आहेत.