जुन्या भांडणाच्या कारणावरून ६ ते ७ जणांच्या टोळीने रामवाडी परिसरात एसटी डेपो रविवारी (दि. १५) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास तुफान धिंगाणा घातला.तिघांना लाकडी दांडके,तलवारीने मारहाण करत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी सुरज जाधव सह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मारहाणीत जखमी झालेल्या अश्विन संजय खुडे, (वय ३०, रा. एसटी डेपो समोर, रामवाडी अ.नगर) याने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी खुडे हा त्याच्या मित्रांसह रामवाडी येथील रोडवर असताना जुन्या भांडणाच्या कारणावरुन सुरज जाधव याने त्याला फोन केला व म्हणाला तु जास्त माजला काय तुझे हातपाय तोडून टाकीन.

त्यावर अश्विन त्याला म्हणाला काय झाले आहे तु मला का शिव्या देतो,असे म्हणल्याचा त्याला राग आल्याने तो म्हणाला तु कुठे आहे तेथेच थांब असे म्हणुन सुरज जाधव हा अजय सासवडकर, शुभम गंगेकर, जय लोटके समर्थ ढेरेकर (सर्व रा. तोफखाना अ.नगर) व त्यांचे सोबत इतर अनोळखी इसमांसह रामवाडी येथे आला.

आल्याबरोबर त्याने अश्विन यास लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली.त्यावेळी सुरज जाधव याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने त्याच्या उजव्या हातावर मारुन जखमी केले.

मारहाण करत असताना अश्विनचे मित्र सुधीर राजु मिसाळ, व अजय विजय भोसले (रा. रामवाडी) हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता अजय सासवडकर याने त्याचे हातातील तलवार सुधीर मिसाळ याचे डोक्यात मारुन त्याला जखमी केले व शुभम गंगेकर याने अजय भोसले याच्या पाठीत तलवार मारुन त्याच्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण केली.

त्यावेळी ते तिघे ही जीव वाचविण्यासाठी तेथुन पळुन जात असताना आरोपींनी दगडफेक करून एसटी डेपोसमोर लावलेली बुलेट मोटारसायकल (क्र.एम एच १४ ए टी ६६९९) व (क्र. एम एच १६ सी जे ०००५) तसेच रिक्षा (क्र. एम एच १६ सी ई १८८८), ऍक्सेस मोपेड गाडी (क्र. एम एच १६ ए जी १४४४) असे गाड्यांचे फोडुन नुकसान केले व म्हणाले तुला कोणाला आणायचे त्याला आण, तु जर आंम्हाला परत भेटला तर तुला आंम्ही जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देवुन मोठ मोठ्याने शिव्या देत तेथुन निघुन गेले.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अश्विन खुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज जाधव, अजय सासवडकर, शुभम गंगेकर, जय लोटके, समर्थ ढेरेकर व त्यांचे सोबत असणाऱ्या इतर अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.