Axis Bank FD Rates : तुम्हीही येत्या काळात एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. अलीकडे बँकांमध्ये एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे बँकांनी आता एफडीवर चांगले रिटर्न देण्यास सुरुवात केली आहे. विविध नॅशनल बँकांनी आणि स्मॉल फायनान्स बँकांनी याच्या व्याज दरात वाढ केली आहे.
त्यामुळे एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे. जाणकार लोकांनी सध्याचा काळ हा एफडी साठी सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. अशातच आता आगामी काळात एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील एका बड्या बँकेने एफ डी व्याज दरात वाढ केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ॲक्सिस बँकेने आपले एफ डी व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सुधारित रेटनुसार आता सामान्य ग्राहकांना सदर बँकेच्या माध्यमातून एफडी साठी तीन टक्क्यांपासून ते 7.20 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळणार आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.85 % दराने व्याज मिळणार आहे. त्यामुळे ॲक्सिस बँक या प्रायव्हेट सेक्टर मधील बड्या बँकेत मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण या बँकेचे सुधारित दर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ॲक्सिस बँकेचे सुधारित एफडी दर
सात दिवसांपासून ते 29 दिवसांपर्यंतच्या एफडी साठी सामान्य ग्राहकांना तीन टक्के आणि जेष्ठ नागरिकांना 3.50% या दराने व्याज दिले जाणार आहे.
30 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतच्या एफडी साठी सामान्य ग्राहकांना 3.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.00% या रेटने परतावा दिला जाणार आहे.
46 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंतच्या एफडी साठी सामान्य ग्राहकांना 4.50 आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.75 या रेटने परतावा मिळणार आहे.
61 दिवस ते तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 4.50 आणि ज्येष्ठ नागरिकांना पाच टक्के रेटने परतावा मिळणार आहे.
तीन महिने ते सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 4.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के या रेटने परतावा मिळणार आहे.
सहा महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 5.75 ते ज्येष्ठ नागरिकांना 6.25 या दराने व्याज मिळणार आहे.
नऊ महिने ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.50% या रेटने व्याज मिळणार आहे.
1 वर्षे ते पंधरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 6.70 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.20% या प्रयतने व्याज मिळणार आहे.
पंधरा महिन्यांपासून ते 17 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% या रेटने व्याज मिळणार आहे.
17 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 7.20 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के रेटने व्याज मिळणार आहे.
18 महिने ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% रेटने व्याज मिळणार आहे.
पाच वर्षे ते दहा वर्ष कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% या रेटने व्याज मिळणार आहे.