Bank Of Baroda FD Scheme
Bank Of Baroda FD Scheme

Bank Of Baroda FD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. भारतात गुंतवणुकीसाठी विविध ऑप्शन उपलब्ध आहेत. कोणी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत, तर कोणी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय, कोणी निश्चित परतावा मिळावा म्हणून बचत योजनेमध्ये गुंतवणूक करत आहे.

पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. तसेच बँकेच्या एफडी योजनेत देखील पूर्वीसारखीचं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.

विशेष म्हणजे अलीकडे बँका एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत असल्याने महिला वर्ग देखील बँकेच्या मुदत ठेव योजनेत मोठ्या प्रमाणात आपल्याकडील पैसा गुंतवत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात FD करण्याच्या तयारीत असाल, विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच फायद्याची ठरणार आहे. कारण की आज आपण बँक ऑफ बडोदा च्या 399 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदाची स्पेशल FD योजना

बँक ऑफ बडोदाने 399 दिवसांची तिरंगा प्लस ही स्पेशल FD योजना सुरू केली आहे. या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास सामान्य ग्राहकांना 7.15% या इंटरेस्ट रेटने व्याज ऑफर केले जात आहे.

याशिवाय जे ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करतात त्यांना बँकेच्या माध्यमातून 0.50 टक्के अधिकचे इंटरेस्ट रेट अर्थातच 7.65% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.

जर समजा बँकेच्या या एफडी योजनेच्या नॉन कॉलेबल ऑप्शन मध्ये सामान्य ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.30% आणि जेष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.80% एवढे व्याजदर मिळणार आहे.

5 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?

जर समजा बँक ऑफ बडोदाच्या या योजनेत सामान्य ग्राहकाने 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर पाच लाख 40 हजार 347 रुपये मिळणार आहेत म्हणजे 40,347 रुपये हे व्याज म्हणून दिले जाणार आहेत.

तसेच जर ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर पाच लाख 43 हजार 261 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 43,261 रुपये व्याज स्वरूपात दिले जाणार आहेत.