Bank RD News : गेल्या काही वर्षांमध्ये बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. अलीकडे महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात बँकेच्या एफडी योजनेत पैसा गुंतवत असल्याची वास्तविकता आहे. याचे कारण म्हणजे देशातील जवळपास सर्वच बँकांनी एफडी व्याजदरात चांगली मोठी वाढ केली आहे.
यामुळे एफडी मध्ये केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. एफडी शिवाय बँकेच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ज्या लोकांकडे गुंतवणूक करण्यासाठी एकरकमी पैसा नसतो असे लोक बँकेच्या आरडी योजनेत गुंतवणूक करतात.
आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवली जात असते. जवळपास सर्वच बँकांच्या माध्यमातून आरडी ऑफर केली जात आहे. दरम्यान आज आपण देशातील अशा पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की आरडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत.
एचडीएफसी बँक : भारतातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक म्हणजेच एचडीएफसी. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरडीवर 7.10 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहे. सहा महिन्यांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या आरडीसाठी एचडीएफसी बँक 4.50 टक्क्यांपासून ते 7.10% पर्यंतचे व्याज देते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर दिले जात आहे.
SBI : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक वर्ष ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर 6.80% ते 7% या दराने व्याज ऑफर करत आहेत.
आयसीआयसीआय बँक : भारतातील खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणजेच आयसीआयसीआय बँक. ही बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सहा महिने ते दहा वर्ष कालावधीच्या आरडीवर 4.75% ते 7.20% यादरम्यान व्याज ऑफर करत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 5.25% ते 7.75 टक्के एवढे व्याज दिले जात आहे.
कोटक महिंद्रा बँक : कोटक महिंद्रा बँक सहा महिने ते दहा वर्ष कालावधीच्या आरडीवर सहा टक्के ते 7.40% एवढे व्याज ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 6.50% ते 7.90% यादरम्यान व्याज दिले जात आहे.
येस बँक : येस बँक खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक सहा महिन्यांपासून ते पाच वर्ष कालावधीच्या आरडीवर 6.10 टक्क्यांपासून ते 7.75 टक्के व्याज देत आहे.