Canara Bank Car Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार घेण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना नवीन कार खरेदी करण्यासाठी लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की आज आपण कॅनडा बँकेच्या कार लोनची माहिती पाहणार आहोत. नवीन कार खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते.
मात्र नवीन गाडी खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसा उपलब्ध नसतो.अशावेळी कार लोन हा पर्याय फायदेशीर ठरतो. काही ठराविक रक्कम डाऊन पेमेंट केल्यानंतर उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात मिळते. देशातील विविध बँका कार लोन ऑफर करत आहेत.
कॅनडा बँक देखील आपल्या ग्राहकांसाठी कार लोन देते. मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये एवढे असते त्यांना कॅनरा बँकेच्या माध्यमातून कार लोन सहजतेने मिळते.
दरम्यान आता आपण कॅनडा बँकेकडून जर पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार आणि या कर्जासाठी किती व्याज द्यावे लागणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
5 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार
जर तुम्ही कॅनडा बँकेकडून रेपो लिंक लँडिंग रेटनुसार कार लोन घेतले तर तुम्हाला दहा टक्के इंटरेस्ट रेटने कर्ज मिळणार आहे. समजा एखाद्याला या इंटरेस्ट रेटने पाच लाख रुपयांचे कर्ज 84 महिन्यांसाठी मंजूर झाले तर त्याला आठ हजार 301 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सहा लाख 97 हजार 284 रुपये सदर व्यक्तीला भरावे लागणार आहेत. यामध्ये व्याज म्हणून एक लाख 97 हजार 284 रुपये द्यावे लागणार आहे. तथापि कॅनडा बँक सिबिल स्कोरच्या आधारावर व्याजदर आकारत असते.
ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांच्याकडून कमी व्याज वसूल केले जाते. सिबिल स्कोर चांगला असेल तर कमी व्याजदरात कर्ज मंजूर होते. मात्र जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँकेकडून अधिकचे व्याजदर आकारले जाऊ शकते.