Car Loan Charges
Car Loan Charges

Car Loan Charges : जसे घराचे स्वप्न असते तसेच स्वतःची एक कार असावी असे देखील अनेकांचे स्वप्न असते. दरम्यान कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण कर्ज घेत असतात. थोडेफार पैसे डाऊन पेमेंट करून ग्राहक ईएमआयवर कार खरेदी करत असतात. मात्र कार लोन घेतांना ग्राहकाने काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

खरेतर कार लोन देताना बँकांच्या माध्यमातून व्याजाव्यतिरिक्त सहा प्रकारचे चार्जेस वसूल केले जातात. त्यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात ईएमआय वर कार खरेदी करणार असाल तर सर्वप्रथम बँकांच्या माध्यमातून आकारल्या जाणाऱ्या चार्जेस विषयी सविस्तर अशी माहिती जाणून घ्या. ते चार्जेस तुम्हाला परवडणारे आहेत की नाही याची आधी चाचपणी करा.

त्यानंतर मग जी बँक तुम्हाला चार्जेस पकडून स्वस्त कार लोन देईल त्या बँकेकडून कार लोन घ्या. असे केल्यास तुम्हाला स्वस्तात कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. दरम्यान आता आपण कार लोनवर बँकांच्या माध्यमातून कोणते सहा प्रकारचे चार्जेस वसूल केले जातात हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

प्रोसेसिंग फी : बँका कार लोन देताना एकूण कर्जाच्या दोन टक्के एवढी रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारतात. यावर अतिरिक्त जीएसटी देखील द्यावी लागते. मात्र वेगवेगळ्या बँकांमध्ये प्रोसेसिंग फि ही वेगवेगळी राहणार आहे.

लोन डॉक्युमेंटेशन चार्जेस : लोन डॉक्युमेंटेशन चार्जेस म्हणून 500 रुपयांपर्यंतची रक्कम आकारली जाऊ शकते. काही बँका लोन डॉक्युमेंटेशन चार्जेस म्हणून यापेक्षा अधिकची रक्कम वसूल करत आहेत. यावर अतिरिक्त जीएसटी देखील द्यावी लागते.

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे RC कलेक्शन फि : यासाठी बँकांच्या माध्यमातून 500 ते 1000 प्लस जीएसटी एवढे शुल्क आकारले जाऊ शकते.

पार्ट प्री पेमेंट चार्जेस : 24 महिन्यांपेक्षा जास्तीचे कर्ज असेल तर हे शुल्क आकारले जात नाही. यापेक्षा कमी कालावधीचे कर्ज असेल तर मात्र हे शुल्क आकारले जाऊ शकते. हे शुल्क तीन टक्क्यांपर्यंत असू शकते.

Penal Charges For Late Payment : जर तुमचा हप्ता थकला तर बँकेच्या माध्यमातून हप्त्याची पाच टक्के एवढी रक्कम पेनल्टी म्हणून आकारली जाते.

प्री पेमेंट चार्जेस : जर तुम्ही कर्ज Foreclosure करणार असाल तर तुम्हाला बँकेला प्री पेमेंट चार्जेस द्यावे लागतात. 13 ते 24 महिने कालावधी मधील कर्ज असेल तर दोन टक्के एवढे प्री पेमेंट चार्जेस द्यावे लागतात. जर समजा तुमचे कर्ज हे बारा महिने कालावधी पर्यंतचे असेल तर तुम्हाला तीन टक्के प्री पेमेंट चार्जेस द्यावे लागणार आहेत.