Car Loan
Car Loan

Car Loan : जर तुम्हीही नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल आणि यासाठी कार लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरंतर अलीकडे विविध बँका, एन बी एफ सी आणि वित्तीय संस्था ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर कार लोन उपलब्ध करून देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात कार लोन पुरवत आहे.

एसबीआय सर्वात कमी इंटरेस्ट रेट वर कार लोन देण्याचा दावा करत आहे. दरम्यान आज आपण एसबीआयच्या कार लोनची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या इंटरेस्ट रेटवर कार लोन मिळते ?

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.85% या इंटरेस्ट रेटवर कार लोन पुरवत आहे. मात्र हा व्याजदर बँकेचा किमान व्याजदर आहे. या व्याजदरात फक्त ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच कार लोन दिले जात आहे.

किती वर्षांसाठी मिळते कर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया ऑन रोड प्राईस वर ग्राहकांना सात वर्षांसाठी कार लोन मिळते. बँकेच्या माध्यमातून कार लोन साठी कोणतेचं प्री पेमेंट चार्ज वसूल केले जात नाही. या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे दोन वर्षानंतर कर्जाची पूर्ण रक्कम परतफेड केली तर फोरक्लोजर चार्ज देखील लागत नाही.

आठ लाखाचे कर्ज घेतल्यास कितीचा हफ्ता भरावा लागणार?

जर एखाद्या ग्राहकाला आठ लाख रुपयांचे कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी 8.85 टक्के या इंटरेस्ट रेटवर मंजूर झाले तर 16,549 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे या कालावधीत तुम्हाला नऊ लाख 92 हजार 940 रुपये भरावे लागणार आहे. अर्थातच एक लाख 92 हजार 940 रुपये तुम्हाला व्याज म्हणून द्यावे लागणार आहे.