Cheapest Car Loan : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. जर तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर शोरूमला भेट देण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. आज आपण देशातील अशा पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की परवडणाऱ्या व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहेत.
खरे तर अनेकांचे कार खरेदीचे स्वप्न असते. यासाठी अनेक जण कार लोन घेतात. मात्र, कार लोन अशा बँकांकडून घेण्याचा सल्ला दिला जातो ज्या बँका कमी इंटरेस्ट रेटने कर्ज देतात.
त्यामुळे अनेकांच्या माध्यमातून परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर कार लोन देणाऱ्या बँकांविषयी माहिती विचारली जात होती. यामुळे आज आपण देशातील स्वस्त कार लोन उपलब्ध करून देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत.
युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक 8.70% या इंटरेस्ट रेट ने आपल्या ग्राहकांना कार लोन उपलब्ध करून देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. भारतात एकूण 12 सरकारी बँका असून या 12 पैकी एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर वाहन कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. एसबीआय 8.75% या इंटरेस्ट रेट ने कार लोन पुरवत आहे.
बँक ऑफ इंडिया : मिळालेल्या माहितीनुसार या पब्लिक सेक्टर बँकेकडून आपल्या ग्राहकांना 8.85% या इंटरेस्ट रेट ने कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा ही देखील एक प्रमुख पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 8.90% या इंटरेस्ट रेट ने कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
आयसीआयसीआय बँक : ही प्रायव्हेट सेक्टर मधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक देशातील टॉप तीन सुरक्षित बँकांच्या यादीत समाविष्ट आहे. या खाजगी बँकेकडून आपल्या ग्राहकांना 9.10% या इंटरेस्ट रेट ने कार लोन उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.