कॅडबरी 5 स्टार ने या स्कीम बद्दल त्यांच्या सोशल मीडिया वर या बद्दल एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.चॉकलेट खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो तसेच वजन वाढण्याची समस्या तसेच दात किडण्याची समस्या निर्माण होते शिवाय वजन वाढायला लागते असे डॉक्टर नेहमी सांगत असतात.
तुम्ही या सगळ्या गोष्टी लहानपणापासून ऐकत आला असाल.पण चॉकलेट खाल्ल्यामुळे तुम्ही लखपती बनू शकता हे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितले नसेल ! पण मी आज जे सांगतोय ते ऐकून तुम्ही खरच थक्क व्हाल.
चॉकलेट खाण्याची सवय तुम्हाला अडीच लाख रुपये जिंकून देऊ शकते.त्यासाठी फक्त तुम्हाला एक सर्कल,ट्रायंगल आणि एक स्क्वेयर शोधायची गरज आहे.
या कॅडबरी मार्फत एका कोरियन वेब सिरीजचा आधार घेऊन नवीन गेम लॉन्च केला आहे.या गेम मधील विजेत्याला ४.५६ मिलियन कोरियाई वोंन म्हणजे दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये मिळण्याची संधी मिळणार आहे.
त्यासाठी तुम्हाला त्यांच्या नियमानुसार प्रत्येक सहभागी व्यक्तीला एक कॅडबरी 5 स्टार विकत घ्यावी लागेल.कॅडबरी 5 स्टार विकत घेतल्यावर सहभागी व्यक्तीला त्याच्या चॉकलेट च्या कागदावर तुम्हाला एक सर्कल,ट्रायंगल आणि एक स्क्वेयर शोधायची गरज आहे.
या तीन गोष्टी संपूर्ण भारतात कोणत्याही ठिकाणच्या फाईव्ह स्टार चॉकलेट च्या कागदावर एकत्रित सापडू शकतात.फाईव्ह स्टार च्या शोशल मीडिया हॅन्डल वरून सांगितलेल्या माहितीनुसार जर कोणाच्या चॉकलेट च्या कागदावर या तीन आकृत्या सापडल्या तर त्या कागदाचा फोटो काढून त्यांच्या इंस्टाग्राम वर मेसेज बॉक्स मध्ये पाठवावा लागेल.
ज्या व्यक्तीला पहिल्यांदा हि आकृती सापडेल आणि जो व्यक्ती त्यांना पहिल्यांदा फोटो पाठवेल त्या व्यक्तीला दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये मिळतील.