FD Interest Rate Hike
FD Interest Rate Hike

FD Interest Rate Hike : आज एक मे अर्थातच महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे. महाराष्ट्र दिनानिमित्ताने संपूर्ण राज्यात मोठे उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान आज महाराष्ट्र दिनी देशातील एका बड्या बँकेने एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये एफडीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. FD म्हणजे मुदत ठेव हा गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे.

असं म्हणतात की एफडी मधील गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक आहे. येथे गुंतवलेला पैसा वाया जात नाही. विशेष म्हणजे अलीकडे या ठिकाणी गुंतवलेला पैसा झपाट्याने वाढू लागला आहे. कारण की एफडी वरील व्याजदर गेल्या काही वर्षात आधीच्या तुलनेत अधिक वाढले आहे.

त्यामुळे आता महिला गुंतवणूकदार देखील FD मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. आधी महिला सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देत असत. मात्र आता महिला वर्ग देखील एफडी करू लागला आहे. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे ॲक्सिस बँकेने आजपासून दोन कोटी रुपये ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केलेली आहे. बँकेने सुधारित केलेले हे नवीन दर आज पासून लागू होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दोन कोटी रुपये ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी मधील गुंतवणुकीला बल्क एफडी म्हणून ओळखले जाते. या बल्क एफडी मध्ये मात्र जेष्ठ नागरिकांना तथा सामान्य ग्राहकांना सारखेच व्याज दिले जाते.

या योजनेत जर एखाद्या ग्राहकाने ठराविक कालावधीसाठी पैसा गुंतवला तर तो पैसा ती कालावधी पूर्ण होईपर्यंत काढता येत नाही. ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून 30 दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीसाठी बल्क FD ऑफर केली जात आहे. दरम्यान आता आपण ॲक्सिस बँकेचे आज पासून लागू झालेले नवीन सुधारित दर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

30 ते 45 दिवस : 5.50%
46 ते 60 दिवस : 5.75%
६१ दिवस ते ३ महिन्यांपेक्षा कमी : 6 टक्के
3 महिने ते 4 महिन्यांपेक्षा कमी : 6.75 टक्के
4 महिने ते 5 महिन्यांपेक्षा कमी: 6.75 टक्के
5 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी: 6.75 टक्के
6 महिने ते 7 महिन्यांपेक्षा कमी: 7 टक्के
7 महिने ते 8 महिन्यांपेक्षा कमी: 7 टक्के
8 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी: 7 टक्के
9 महिने ते 10 महिन्यांपेक्षा कमी: 7.25 टक्के
10 महिने ते 11 महिन्यांपेक्षा कमी: 7.25 टक्के
11 महिने 25 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: 7.25 टक्के
1 वर्ष ते 1 वर्षापेक्षा कमी 4 दिवस: 7.55 टक्के
1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी 11 दिवस: 7.55 टक्के
1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 24 कमी: 7.55 टक्के
1 वर्ष 25 दिवस ते 13 महिन्यांपेक्षा कमी: 7.55 टक्के
13 महिने ते 14 महिन्यांपेक्षा कमी: 7.55 टक्के
14 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी: 7.20 टक्के
15 महिने ते 16 महिन्यांपेक्षा कमी: 7.50 टक्के
16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी: 7.45 टक्के
17 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: 7.45 टक्के
18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी: 7.45 टक्के
2 वर्षे ते 30 महिन्यांपेक्षा कमी: 7.20%
30 महिने ते 3 वर्षांपेक्षा कमी: 7.20 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: 7.20 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे: 7.20 टक्के.