FD News : भारतात फार पूर्वीपासून सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारी बचत योजना आणि बँकेच्या एफडी योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. दरम्यान जर तुम्हीही नजिकच्या भविष्यात एफडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फायद्याचा ठरणार आहे.
कारण की आज आपण एफ डी वर सर्वाधिक व्याजदर लागू असणाऱ्या बँकांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही या बँकांमध्ये एफडी केली तर तुम्हाला अधिकचा परतावा मिळू शकणार आहे.
खरंतर अनेकांच्या माध्यमातून एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांबाबत विचारणा केली जात होती. यामुळे आज आपण FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या टॉप 6 बँकांची माहिती पाहणार आहोत.
FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँका
SBM बँक : एसबीएम बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करते. यां बँकेकडून सामान्य ग्राहकांना 8.25% व्याज ऑफर केले जात आहे. दुसरीकडे बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% अधिकचे इंटरेस्टरेट लागू करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 8.75% व्याज देत आहे.
बंधन बँक : बंधन बँक देखील आपल्या ग्राहकांना साडेआठ टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहे. ही बँक सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 8% एवढे व्याज देते. तसेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना झिरो पॉईंट 50 टक्के अधिकचे व्याज म्हणजेच 8.50% पर्यंतचे व्याज देते.
DCB बँक : DCB बँक सुद्धा बंधन बँकेप्रमाणेच व्याज देत आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 8% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.50% व्याज देत असल्याची माहिती बँकेकडून समोर आली आहे.
येस बँक : खाजगी क्षेत्रातील प्रतिष्ठित बँक येस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना सर्वाधिक 7.75% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.25% व्याज देत आहे.
RBL बँक : आपल्या सामान्य ग्राहकांना FD वर जास्तीत जास्त 7.50% व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% पर्यंत व्याज देत आहे.
IDFC फर्स्ट बँक : आपल्या सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 7.50% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% पर्यंत व्याज देत आहे.