FD News : जर तुम्हीही येत्या काही दिवसात तुमच्याकडील पैसा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवू इच्छित असाल तर कोणत्याही बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. कारण की, आज आपण एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या देशातील काही प्रमुख बँकांची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वाधिक बेस्ट पर्याय आहे. कारण की, एफडी मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. शिवाय अलीकडे बँकांनी एफडी व्याज दरात बऱ्यापैकी सुधारणा देखील केलेली आहे.
तथापि अनेकांच्या माध्यमातून एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांबाबत नेहमीच विचारणा होत असते. अशा परिस्थितीत, आज आपण एफडीवर तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज देणाऱ्या बँकांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या आहेत एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
युनिटी बँक : मिळालेल्या माहितीनुसार युनिटी बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करते. हे सर्वाधिक व्याज 1001 दिवसांच्या एफडीवर ऑफर केले जाते. या एफ डी वर बँकेकडून सामान्य ग्राहकांना 9% आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% एवढे व्याज दिले जाते.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : ही स्मॉल फायनान्स बँक एफडी करणाऱ्यांना 9.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करते. 546 दिवसांपासून ते 1111 दिवसांपर्यंतच्या एफडीवर या बँकेकडून सामान्य ग्राहकांना 9% आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% एवढे व्याज दिले जाते.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक दोन वर्ष कालावधीच्या एफडीवर सीनियर सिटीजन ग्राहकांना 9.10% आणि सामान्य ग्राहकांना 8.60% या दराने व्याज दिले जाते.