FD News : भारतात फार पूर्वीपासून गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट अर्थातच एफडीला प्राधान्य दाखवले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये एफडीवर बँकांकडून चांगले व्याजदर सुद्धा ऑफर केले जात आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँकांकडून एफडीसाठी अधिकचे व्याजदर दिले जात आहे.
यामुळे अलीकडे महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात एफडी मध्ये गुंतवणूक करू लागला आहे. जर तुम्ही देखील आगामी काळात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे.
ती म्हणजे देशातील एका बड्या बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेने आपले एफडीचे व्याजदर रिवाईज केले आहेत.
विशेष म्हणजे हे सुधारित व्याजदर कालपासून अर्थातच एक ऑगस्ट 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी साठीचे व्याजदर सुधारित केले आहेत.
या बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी ऑफर केली जाते. यावर पंजाब नॅशनल बँकेकडून 3.50% ते 7.25% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे.
मात्र ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा अधिकचे व्याजदर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचा इंटरेस्ट रेट ऑफर केला जात आहे. दरम्यान, आता आपण पंजाब नॅशनल बँकेचे सुधारित एफडी व्याजदर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेचे सुधारित व्याजदर
पंजाब नॅशनल बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या माध्यमातून चारशे दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर केले जात आहे. ही बँक चारशे दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.25% या दराने व्याज देत आहे.
मात्र याच कालावधीच्या एफडी साठी ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75% या दराने व्याज दिले जात आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिकचे इंटरेस्ट रेट मिळणार आहे.