FD News : तुम्ही निवृत्त झाल्यावर तुमचे नियमित उत्पन्न बंद होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला आतापासूनच आर्थिक नियोजन करावे लागेल, जेणेकरुन तुम्हाला वृद्धापकाळातही पैशाची अडचण येऊ नये. खरेतर, जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा लोकांच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे FD (फिक्स्ड डिपॉझिट).
जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील काही प्रमुख बँकांच्या एफडीवरील व्याजदराची माहिती पाहणार आहोत.
देशातील मोठ्या बँका ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर किती व्याज देत आहेत याच संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत. खरे तर फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
अलीकडे बँकांनी देखील ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी व्याजदरात सुधारणा केली आहे. छोट्या छोट्या फायनान्स बँका FD वर राष्ट्रीय बँकांपेक्षा अधिकचा परतावा देतात. राष्ट्रीय बँका देखील फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अलीकडे चांगला परतावा देताना दिसत आहेत.
देशातील प्रमुख बँकांचे एफडी वरील व्याजदर
Axis Bank : ही भारतातील एक प्रमुख खाजगी बँक असून ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ही बँक पाच वर्षांच्या एफ डी वर जेष्ठ नागरिकांना तब्बल 7.75% इंटरेस्ट रेटने परतावा देत आहे.
DCB बँक : डीसीबी बँक पाच वर्षांच्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.90% व्याजदराने परतावा देत आहे.
Federal Bank : पाच वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फेडरल बँक 7.75% इंटरेस्ट रेटने परतावा देत आहे.
येस बँक : पाच वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना येस बँक आठ टक्के दराने परतावा देत असल्याची माहिती समोर आली आहे.
RBL बँक : आरबीएल बँक पाच वर्षे कालावधीच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.60% दराने परतावा देते.