Home आर्थिक FD करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ 3 बँका देताय मुदत ठेव योजनेवर...

FD करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ 3 बँका देताय मुदत ठेव योजनेवर नऊ टक्क्यांपर्यंतचे व्याज

FD News
FD News

FD News : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व बँकेची एक मोठी बैठक झाली. यात रेपो रेट मध्ये बदल करण्याबाबत निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात होते. पण, रिझर्व बँकेने पुन्हा एकदा रेपो रेट मध्ये कोणताच बदल केला नाही. तज्ञांच्या मते जर रेपो रेट मध्ये बदल झाला असता आणि रेपो रेट कमी झाला असता तर एफडीच्या व्याजदरात कपात झाली असती.

दुसरीकडे होम लोन, वाहन लोन तसेच पर्सनल लोनचे ईएमआय कमी झाले असते. मात्र रेपो रेटमध्ये बदल झाला नसल्याने एफडीचे व्याजदर असेच कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या देशातील अनेक बँका एफडी साठी म्हणजेच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहेत.

यामुळे सध्याचा काळ हा मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही देशातील कोणत्या बँका FD वर सर्वाधिक व्याज देत आहेत याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

खरे तर नॅशनल बँकांऐवजी छोट्या स्मॉल फायनान्स बँका एफडीवर अधिकचे व्याज देत आहे. यामुळे आज आपण अशाच स्मॉल फायनान्स बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेव योजनेवर चांगले व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 5 वर्षांच्या एफडीवर 9.10 टक्के व्याज देत आहे.

दुसरीकडे बँकेच्या माध्यमातून याच कालावधीच्या एफडी साठी जेष्ठ गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा दिला जात आहे. ही बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना याच कालावधीसाठी 9.60 टक्के एवढे व्याज देत आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 0.50% एवढे अधिकचे व्याज मिळत आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही बँक आपल्या ग्राहकांना FD वर 9.50 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न देत आहे. सामान्य ग्राहकांना 1001 दिवसांच्या FD वर ही बँक 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50 टक्के व्याज ऑफर करत आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : मिळालेल्या माहितीनुसार फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या FD वर 8.51 टक्के व्याज देत आहे आणि आपल्या ज्येष्ठ ग्राहकांना याच कालावधीसाठी 9.11 टक्के व्याज देत आहे.