HDFC Bank Home Loan
HDFC Bank Home Loan

HDFC Bank Home Loan : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न असेल. काहींनी हे स्वप्न नुकतेच पूर्ण केले असेल तर काही जण नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घेऊन गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असतील. दरम्यान, जर तुम्हीही येत्या काळात नवीन घर खरेदी करण्यासाठी कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जा विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण एचडीएफसी बँकेचे होम लोन साठी चे व्याजदर किती आहे? या बँकेकडून जर 60 लाख रुपयांचे गृह कर्ज 30 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर ग्राहकाला किती रुपयांचा हफ्ता भरावा लागणार? या महत्त्वपूर्ण बाबी विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

एचडीएफसी बँकेचे गृह कर्जासाठीचे व्याजदर

एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून 9.40% ते 9.95% या इंटरेस्ट रेटने गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र एचडीएफसी बँकेचे होम लोन साठीचे स्पेशल व्याजदर हे 8.75 ते 9.65 या दरम्यान आहेत.

मात्र हे स्पेशल व्याजदर फक्त काही मोजक्याचं लोकांसाठी राहणार आहेत. महिला ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना देखील इतर ग्राहकांपेक्षा कमी इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध होणार आहे. 

30 वर्षांसाठी 60 लाखांचे गृह कर्ज घेतले तर

एचडीएफसी बँकेकडून तीस वर्ष कालावधीसाठी 60 लाख रुपयांचे गृह कर्ज 8.75 टक्के या किमान इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज मंजूर झाले तर 47 हजार 202 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे या कालावधीत मुद्दल अन व्याज असे एक कोटी 69 लाख 92 हजार 720 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे एक कोटी नऊ लाख 92 हजार 720 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.