HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट मध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि देशातील इतर बँकांप्रमाणेचं एचडीएफसी बँकेच्या इतर कर्जांपेक्षा वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे काहीसे अधिकच आहेत.
खरे तर वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज प्रकारात येते. त्यामुळे बँका वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारतात. हेच कारण आहे की खूपच इमर्जन्सी असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा ऑप्शन निवडावा अन्यथा इतर पर्यायी मार्गाने पैशांची सोय करावी असा सल्ला तज्ञांच्या माध्यमातून दिला जात आहे.
दरम्यान जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्जाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर
एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 10.75 टक्के या किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर आहे याचा लाभ फक्त ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळू शकतो.
किमान ८०० च्या आसपास सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना या व्याजदरात वैयक्तिक कर्जाचा लाभ मिळणे शक्य आहे. परंतु ज्यांचा सिबिल स्कोर कमी आहे त्यांना यापेक्षा अधिकच्या रेटने व्याज द्यावे लागणार आहे.
5 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार?
जर एचडीएफसी बँकेकडून एखाद्या ग्राहकाला 10.75% या किमान इंटरेस्ट रेटवर पाच लाख रुपयांचे कर्ज तीन वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला कितीचा हप्ता भरावा लागणार ? एचडीएफसी पर्सनल लोन कॅल्क्युलेटर नुसार, सदर व्यक्तीला 16,310 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजे त्या व्यक्तीला पाच लाख 87 हजार 160 रुपये भरावे लागणार आहेत. त्यामध्ये पाच लाख रुपये कर्जाची रक्कम आणि उर्वरित 87 हजार 160 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी 87 हजार 160 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे.
विशेष म्हणजे ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच या किमान व्याजदरात कर्ज मंजूर होणार आहे. जर एखाद्याचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तीला अधिकचे व्याज भरावे लागू शकते.