HDFC Home Loan
HDFC Home Loan

HDFC Home Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती पाहणार आहोत. खरे तर अलीकडे देशभरातील विविध बँकां आपल्या ग्राहकांना कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

एचडीएफसी देखील आपल्या ग्राहकांना कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. एचडीएफसी बँकेकडून आपल्या ग्राहकांना 50 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

दरम्यान आज आपण जर एखाद्या ग्राहकाने एचडीएफसी कडून 50 लाखांचे कर्ज घेतले तर त्यांना किती व्याज द्यावे लागणार? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एचडीएफसी बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर

एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठे सरकारी बँक आहे तर एचडीएफसी ही सर्वात मोठे प्रायव्हेट बँक. विशेष म्हणजे आरबीआयने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी जारी केलेल्या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत एचडीएफसी बँकेचा देखील समावेश होतो.

ही प्रायव्हेट सेक्टर मधील बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर विविध कर्ज उपलब्ध करून देत आहे. एचडीएफसीच्या गृहकर्जाबाबत बोलायचं झालं तर या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना 9.40% ते 9.95% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. हे बँकेचे स्टॅंडर्ड इंटरेस्ट रेट आहेत.

ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून कमी इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज मिळते. परंतु ज्यांचा सिबिल स्कोर हा डाऊन असतो त्यांना यापेक्षा अधिकच्या व्याजदरात कर्ज मंजूर होऊ शकते. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये एचडीएफसी बँकेकडून 8.75 टक्के ते 9.65% या इंटरेस्ट रेटवर देखील कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

50 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार?

जर एखाद्या ग्राहकाला एचडीएफसी बँकेकडून 8.75 टक्के या किमान इंटरेस्ट रेटवर 50 लाख रुपयांचे कर्ज 30 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 39 हजार 335 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच सदर ग्राहकाला 30 वर्षांच्या कालावधीत मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण एक कोटी 41 लाख 61 हजार 600 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये 91 लाख 60 हजार 600 रुपये हे व्याज राहणार आहे.

जर समजा 50 लाख रुपयांचे कर्ज 30 वर्ष कालावधीसाठी 9.95% इंटरेस्ट रेटवर मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 43694 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे सदर ग्राहकाला एक कोटी 57 लाख 29 हजार 840 रुपये भरावे लागणार आहेत. एक कोटी सात लाख 29 हजार 840 रुपये हे व्याज म्हणून भरावे लागणार आहेत.