Home Loan : तुमचेही नजीकच्या भविष्यात नवीन घर बनवण्याचे स्वप्न आहे का ? हो मग तुमच्यासाठी आजचा हा लेख फायदेशीर ठरणार आहे. खरेतर घरासाठी अलीकडे गृहकर्जाचा पर्याय स्वीकारला जात आहे. गृह कर्ज घेऊन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने आणि आगामी काळातही घरांच्या किमती अशाच तेजीत राहतील असा अंदाज असल्याने होम लोन घेऊन गृह खरेदीला पसंती दाखवली जात आहे.
जाणकार लोक देखील होम लोन घेऊन गृहखरेदी करणे काही अंशी फायदेशीर असल्याचे बोलत आहेत. दरम्यान जर तुम्ही नजीकच्या काळात होम लोन घेण्याचा तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँकेकडून दहा वर्षांच्या कालावधीसाठी 35 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
HDFC Bank : एचडीएफसी ही भारतातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.75 टक्के या किमान इंटरेस्ट रेटवर होम लोन उपलब्ध करून देत आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो त्यांना या किमान व्याजदरात होम लोन मिळते. जर एखाद्या ग्राहकाला बँकेच्या 8.75 टक्के किमान व्याजदरात 35 लाख रुपयांचे कर्ज दहा वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 43 हजार 864 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
बँक ऑफ बडोदा : ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.40% या किमान व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या किमान व्याजदराचा फायदा होतो. जर समजा एखाद्या ग्राहकाला 8.40% या किमान इंटरेस्ट रेटवर 35 लाख रुपयांचे कर्ज दहा वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 43 हजार 208 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
आयसीआयसीआय बँक : ही बँक किमान नऊ टक्के या इंटरेस्ट रेट वर आपल्या ग्राहकांना होम लोन देत आहे. जर समजा एखाद्या ग्राहकाला या व्याजदरात 35 लाख रुपयांचे कर्ज दहा वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 44 हजार 337 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.50% या इंटरेस्ट रेट वर होम लोन देत आहे. जर एखाद्या ग्राहकाला या व्याजदरात 35 लाख रुपयांचे कर्ज दहा वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 43 हजार 395 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.