JCB EMI Down Payment : JCB एक शक्तिशाली मशीन आहे. जेसीबी, महिंद्रा आणि बुल यांसारख्या अनेक कंपन्यांचे बुलडोझर भारतात उपलब्ध आहेत. मात्र, सर्व बुलडोझर आपण JCB म्हणूनचं ओळखतो. अनेक मोठी कामे सुलभ करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. शेती कामांमध्ये देखील जेसीबीचा वापर सर्रासपणे होतो.
शेतीची लेव्हलिंग करण्यापासून ते पाईपलाईन खोदण्यापर्यंत सर्वच ठिकाणी जेसीबीचा वापर होतो. विहीर खोदण्यासाठी देखील जेसीबी चा वापर होतो. पंधरा-वीस फूट खोल विहीर खोदायची असेल तर यासाठी जेसीबी चा वापर होतो.
इतरही अनेक छोट्या मोठ्या कामांमध्ये या यंत्राचा वापर होत असून अनेक जण जेसीबी खरेदी करून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. रस्त्यांच्या कामांमध्ये देखील जेसीबीचा वापर होतो. हे शक्तिशाली यंत्र शेती आणि बांधकामासारख्या ठिकाणी उपयुक्त ठरते.
ट्रकच्या लोडिंग-अनलोडिंगपासून ते ट्रॅक्टर-ट्रॉलीपर्यंत ही सर्व कामे बुलडोझरच्या साह्याने करता येतात. दरम्यान जर तुम्हाला जेसीबी खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण हप्त्याने जेसीबी खरेदी करण्यासाठी किती रुपये डाऊन पेमेंट करावे लागणार आणि किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार याबाबतचे संपूर्ण गणित समजून घेणार आहोत. देशाची राजधानी दिल्लीत JCB 3DX सुपरची किंमत 34 ते 36 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
हफ्त्यावर JCB खरेदी करण्यासाठी किती रुपये डाऊन पेमेंट करावे लागणार?
जर तुमच्याकडे जेसीबी खरेदी करण्यासाठी पूर्ण अमाऊंट नसेल तर तुम्ही दहा टक्के रक्कम डाऊन पेमेंट करून जेसीबी हप्त्याने घेऊ शकतात. म्हणजे बँकेकडून कर्ज घेऊन बुलडोझर खरेदी करता येतो. यासाठी बँकेने ठरवलेल्या व्याजदरानुसार ठराविक रक्कम हप्ता म्हणून जमा करावी लागेल.
जर तुम्ही राहत असलेल्या शहरात बुलडोझर ची किंमत ही 34 लाख असेल तर ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून 30.60 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. तुमचा क्रेडिट स्कोअर किती चांगला आहे यावर कर्जाची रक्कम अवलंबून असते.
कर्जावर बुलडोझर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला एकूण रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 3.40 लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. जर बँकेने या कर्जावर 9 टक्के व्याज आकारले आणि तुम्ही हे कर्ज पाच वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला दरमहा 63,521 रुपये EMI भरावे लागेल.
जेसीबी बुलडोझर घेण्यासाठी सहा वर्षांसाठी कर्ज घेतल्यास दर महिन्याला ९ टक्के व्याजाने ५५,२०० रुपयांचा हप्ता बँकेत जमा करावा लागेल. हे कर्ज सात वर्षांसाठी घेतल्यास दरमहा 49,300 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.