Home आर्थिक LIC च्या ‘या’ स्कीम मध्ये दररोज 200 रुपये जमा करा, एकरकमी 28...

LIC च्या ‘या’ स्कीम मध्ये दररोज 200 रुपये जमा करा, एकरकमी 28 लाख रुपये मिळतील ! कसं ते पहा….

LIC New Scheme
LIC New Scheme

LIC New Scheme : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना प्रमाणेच एलआयसीच्या पॉलिसीमध्ये देखील अनेक जण गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस प्रमाणेच एलआयसीच्या पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक देखील पूर्णपणे सुरक्षित असते.

LIC लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी योजना चालवत आहे. एलआयसीच्या योजना अल्प बचतीसोबतच मोठा परतावा देतात. यामुळे या एलआयसीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. महिला वर्ग देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशाच एका उत्तम योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला LIC जीवन प्रगती पॉलिसीबाबत माहिती देणार आहोत. या योजनेत तुम्ही दररोज 200 रुपयांची बचत करून 28 लाख रुपये मिळवू शकणार आहात.

कशी आहे जीवन प्रगती पॉलिसी 

जर तुम्ही LIC ची पॉलिसी घेणार असाल तर ही पॉलिसी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार यात शन्काचं नाही. एलआयसी जीवन प्रगती योजनेत गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळतात. या योजनेत दररोज 200 रुपयांची बचत करूनही लाखो रुपयांचा फंड जमा करता येऊ शकतो.

एखाद्या गुंतवणूकदाराने जर या पॉलिसीमध्ये दररोज दोनशे रुपयांची बचत करून इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला 28 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. शिवाय या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना जोखीम संरक्षण सुद्धा मिळते. LIC च्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा 12 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर कमाल वयोमर्यादा 45 वर्षे एवढी आहे.

कसे मिळणार 28 लाख?

जीवन प्रगती पॉलिसी घेणाऱ्यांना चांगल्या परताव्यासह आजीवन सुरक्षा मिळते. जर पॉलिसीधारकाने या योजनेत दररोज 200 म्हणजे महिन्याकाठी 6000 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला एका वर्षात 72 हजार रुपये गुंतवावे लागतील.

जर या योजनेत 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर प्रतिमहा 6000 रुपयांप्रमाणे 14,40,000 रुपये एवढी गुंतवणूकदाराची गुंतवणूक असेल. या गुंतवणुकीसोबतच पॉलिसी धारकाला इतर सर्व फायदे जोडून 28 लाख रुपये मिळणार आहेत.

जीवन प्रगती योजनेचे वैशिष्ट्ये

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांचे जोखीम कव्हर दर पाच वर्षांनी वाढते. याचा अर्थ तुम्हाला मिळणारी रक्कम पाच वर्षांत वाढते. डेथ बेनिफिट्स मध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विमा रक्कम, साधा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम बोनस एकत्रित केला जातो आणि एकत्रितपणे ही रक्कम दिली जाते.

जीवन प्रगती पॉलिसीची मुदत किमान १२ वर्षे आणि कमाल २० वर्षे आहे. 12 ते 45 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. तुम्ही या पॉलिसीचा प्रीमियम त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरू शकता. या पॉलिसीची किमान विमा रक्कम 1.5 लाख रुपये आहे आणि कमाल मर्यादा नाही.

समजा एखाद्याने 2 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मृत्यू लाभ पहिल्या पाच वर्षांसाठी सामान्य राहील. यानंतर, सहा वर्षे ते 10 वर्षे कव्हरेज 2.5 लाख रुपये असेल. त्याच वेळी, 10 ते 15 वर्षांमध्ये कव्हरेज 3 लाख रुपयांपर्यंत वाढेल. अशा प्रकारे याची व्याप्ती वाढत राहणार आहे.